Dr. Yuti Dhumkekar : पॉवरलिफ्टिंगमध्ये अनेक पदकांची कमाई करणाऱ्या डॉ. युती धुमकेकर ‘प्रवरा क्रीडारत्न’ पुरस्काराने सन्मानित!

Dr. Yuti Dhumkekar : पॉवरलिफ्टिंगमध्ये अनेक पदकांची कमाई करणाऱ्या डॉ. युती धुमकेकर ‘प्रवरा क्रीडारत्न’ पुरस्काराने सन्मानित!

0

Dr. Yuti Dhumkekar : अहिल्यानगर : वैद्यकीय आणि क्रीडा क्षेत्राचा (Medical and Sports Fields) अनोखा संगम साधत अहिल्यानगरचे नाव राज्यपातळीवर चमकवणाऱ्या डॉ. युती अतुल धुमकेकर (Dr. Yuti Dhumkekar) यांना नुकताच प्रतिष्ठेचा ‘प्रवरा क्रीडारत्न सन्मान २०२६-२७’ (Pravara Kreedaratna Award 2026-27) प्रदान करण्यात आला. प्रवरा परिसरात आयोजित एका भव्य सोहळ्यात राज्याचे महसूल मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या शुभहस्ते त्यांना हा क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले.

डॉ. युती धुमकेकर या मूळच्या अहिल्यानगर येथील असून, त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं असून त्या शहरात डॉक्टर आणि डाएटिशियन म्हणून यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत त्यांनी ‘क्लासिक पॉवरलिफ्टिंग’ क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Dr. Yuti Dhumkekar : पॉवरलिफ्टिंगमध्ये अनेक पदकांची कमाई करणाऱ्या डॉ. युती धुमकेकर ‘प्रवरा क्रीडारत्न’ पुरस्काराने सन्मानित!
Dr. Yuti Dhumkekar : पॉवरलिफ्टिंगमध्ये अनेक पदकांची कमाई करणाऱ्या डॉ. युती धुमकेकर ‘प्रवरा क्रीडारत्न’ पुरस्काराने सन्मानित!

क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी

  • महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धा – कांस्य पदक, २०२२
  • महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धा – कांस्य पदक, २०२३
  • महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धा – सुवर्णपदक, २०२५
  • महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धा – रौप्यपदक, २०२६
  • “Strong Woman of Ahilyanagar” हा सन्मान २०२२ पासून

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सर्व स्तरातून अभिनंदन (Dr. Yuti Dhumkekar)

वैद्यकीय ज्ञान, योग्य आहारशास्त्र आणि फिटनेस या त्रिसूत्रीच्या जोरावर डॉ. युती यांनी मिळवलेले हे यश थक्क करणारे आहे. त्यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना ‘प्रवरा क्रीडारत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातून तसेच वैद्यकीय आणि क्रीडा वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत आहे.