
Ahilyanagar Zilla Parishad : अहिल्यानगर: महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद (Ahilyanagar Zilla Parishad) आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, शाखा अहिल्यानगरच्या नूतन व विस्तारित कार्यकारिणीची निवड जाहीर झाली आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी गोरक्ष शेळके तर महिला अध्यक्षपदी सीमा मडके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि हक्कासाठी काम करणार
मधुकर काात्र सभागृहात शनिवार दिनांक २६ रोजी पार पडलेल्या विशेष बैठकीत या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. “एकजुटीने काम करू… आरोग्यदायी समाज घडवू” या ध्येयाने ही संघटना जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी आणि हक्कासाठी काम करणार आहे.
नूतन अध्यक्ष गोरक्ष शेळके यांनी पदभार स्वीकारताना सांगितले की, “जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी संघटना आगामी काळात आक्रमकपणे पाठपुरावा करेल.”
नूतन जिल्हा कार्यकारिणी खालीलप्रमाणे (Ahilyanagar Zilla Parishad)
- अध्यक्ष: गोरक्ष शेळके
- महिला अध्यक्ष: सीमा मडके
- कार्याध्यक्ष: सोपान शेटे, पराग चिंतबर, सुरेखा पालवे आणि जोतिबाला सोनार
- सरचिटणीस: रमेश जावळे आणि मनिषा जाधव
- सचिव: निलेश गाडेकर आणि मीनाक्षी मुळे
- कोषाध्यक्ष: संतोष पालवे आणि ज्योती तोडमल
- सहकोषाध्यक्ष: भूषण शिंदे
- उपाध्यक्ष: जालिंदर खाडे, रविंद्र काळे, स्वाती चौधरी, जयश्री फटांगरे आणि योगेश तिकोणे
- सहसचिव: समीर कुलकर्णी, विक्रम ससे, तान्हाजी गडाख आणि स्वाती चौधरी
- प्रसिद्धी प्रमुख: मिलिंद कांबळे व योगेश सुतार
नवनियुक्त तालुका अध्यक्ष:
- नगर: कल्याणी हेम्बाडे
- पाथर्डी: प्रशांत नरवडे
- नेवासा: शिवाजी जवणे
- राहाता: दीपक एकबोटे
- श्रीरामपूर: अनिकेत कंदारे
- संगमनेर: अरविंद काळे
- श्रीगोंदा: प्रदीप गाढवे
- कोपरगाव: राहुल साळवे
- शेवगाव: आदित्य दगडखेर
- राहुरी: किरण दळवी
या निवडीबद्दल संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक बाळाजी तोडमाल, संभाजी आल्हाड, विलास शेळके, बाळासाहेब फटांगरे, नारायण बोराडे आणि राज्य पातळीवरील प्रतिनिधी किरण खेसमाळसकर, मनोहर डिसले व ज्योती पवार यांच्यासह जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.


