District Bank : जिल्हा बँकेच्या बँकेच्या 21 संचालक पदासाठी एकूण ३६३ उमेदवारी अर्ज

माजी खासदार सुजय विखे, सदाशिव लोखंडे, माजी आमदार बबनराव पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते, आमदार अक्षय कर्डिले, शंकरराव गडाख, आमदार विवेक कोल्हे, बिपिन दादा कोल्हे, यांच्यासह मातब्बरांचे अर्ज; शेवटच्या दिवशी उच्चांकी गर्दी

0
District Bank : जिल्हा बँकेच्या बँकेच्या 21 संचालक पदासाठी एकूण ३६३ उमेदवारी अर्ज
District Bank : जिल्हा बँकेच्या बँकेच्या 21 संचालक पदासाठी एकूण ३६३ उमेदवारी अर्ज

District Bank : नगर : जिल्हा बँकेच्या (District Bank) संचालक पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज (Candidature Application) दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसाच्या मुदतीपर्यंत एकूण ३६३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 903 उमेदवारी अर्जांची (Application Forms) विक्री झाली आहे. अखेरच्या दिवशी माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार अक्षय कर्डिले, आमदार विवेक बिपिन कोल्हे, बिपिन शंकरराव कोल्हे, माजी आमदार बबनराव पाचपुते आणि त्यांचे सुपुत्र प्रतापसिंह पाचपुते, शंकरराव गडाख, सचिन जगताप, अमित भांगरे आदींनी अर्ज दाखल केले.

नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्हा परिषद अभियंत्यांचे एक दिवसाचे वेतन दुष्काळग्रस्तांसाठी

उमेदवार व समर्थकांची गर्दी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालक पदासाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. सोमवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. अखेरच्या दिवशी सारसनगर परिसरातील चहुराणा बुद्रुक येथील निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या कार्यालयात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे उमेदवार आणि त्यांचे समर्थक यांची गर्दी झाली होती. अखेरच्या दिवशी सारस नगर परिसरातील चहुराणा बुद्रुक येथील निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या कार्यालयात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे उमेदवार आणि त्यांचे समर्थक यांची उदंड गर्दी झाली होती. शेवटच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरातील वाहतूक आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शेवटच्या दिवशी दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे (District Bank)

अकोले विकास सोसायटीसाठी मधुकर लक्ष्मण नवले, चंदर भाऊ बांडे, पाथर्डीसाठी आमदार मोनिकाताई राजळे आणि ऋषिकेश ढाकणे, अहिल्यानगर विकास सोसायटीसाठी प्रताप गंगाधर शेळके, अक्षय शिवाजीराव कर्डिले, श्रीरामपूर विकास सोसायटी साठी सोन्याबापु गोविंद शिंदे, करण जयवंत ससाणे, रणजीत दिलीपराव बनकर, सोन्याबापु पुंजाजी राऊत, जामखेड विकास सोसायटी सुधीर जगन्नाथ राळेभात, पारनेरसाठी काशिनाथ महादू दाते, राहुल प्रकाशराव शिंदे, गीतांजली उदय शेळके, राहतासाठी एकनाथ चंद्रभान घोगरे, सुजय राधाकृष्ण विखे पाटील, भास्कर निवृत्ती खर्डे, संगमनेर साठी रणजीत सिंह विजय सिंह देशमुख, चित्रा विठ्ठलराव गायकवाड, शेवगावसाठी चंद्रशेखर मारोतराव घुले आणि राजश्री चंद्रशेखर घुले,

श्रीगोंद्यासाठी अर्चना दत्तात्रय पानसरे, प्रणोती राहुल जगताप, राजेंद्र शिवाजी नागवडे, अण्णासाहेब सिताराम शेलार, राहुल कुंडलिकराव जगताप, बबनराव भिकाजी पाचपुते, प्रतापसिंह बबनराव पाचपुते, सुधीर लक्ष्मण नलगे, अनुराधा कुंडलिकराव जगताप, संध्या महेश महांडुळे, प्रवीण कुमार बन्सीलाल नहाटा, साक्षी श्रीकांत भोस, राहुरी साठी भाऊसाहेब गंगाधर लोंढे, सत्यजित चंद्रशेखर कदम, कोपरगावसाठी बिपिन दादा शंकरराव कोल्हे, विवेक बिपिन दादा कोल्हे, नेवासा शंकरराव यशवंतराव गडाख, कर्जत साठी तुषार आंबादास पिसाळ, सुरेश भागवत साळुंके, किरण अण्णासाहेब पाटील, काकासाहेब लक्ष्मण तापकीर, कैलास शंकरराव शेवाळे.

दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न : संग्राम जगताप

यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा लौकिक मोठा आहे. सध्याची दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सर्वतोपरी केले जात आहेत. यासाठी सर्वांशी संवाद साधत आहोत. यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून संवाद केला जात आहे. अजून पण काय वेळ गेलेली नाही आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. उमेदवारी माघारी घेण्याचा अंतिम क्षणापर्यंत बिनविरोध निवडणूक करण्याचे प्रयत्न केले जातील. आपल्याशी संवाद केला नाही असे ज्यांना वाटत आहे त्यांनी खंत बाळगू नये. अजून गाडी सुटलेली नाही. त्यांनाही विचारात घेतले जाईल. असा मार्मिक टोला आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी नाव न घेता लगावला.

पुण्यातील आंदोलन म्हणजे रोहित पवार नाईट्स : विक्रम पाचपुते

दरम्यान यावेळी जिल्हा बँक निवडणूक शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून आणि दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन बिनविरोध केली जाईल असा विश्वास व्यक्त करीत आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी पुणे येथे सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनाच्या संदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. आमदार पाचपुते म्हणाले, पुणे येथे सुरू असलेले आंदोलन हे आंदोलन राहिलेलं नसून रोहित पवार नाईटस झाले आहे. नाईट शिफ्ट मध्ये हे आंदोलन सुरू आहे. दिवसभर तिथे फक्त 50-100 लोक असतात. हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे आंदोलन आहे.खासदार ओमराजे निंबाळकर हे आंदोलन स्थळी पोहोचले असता त्यांना विद्यार्थ्यांनी ट्रोल करण्यात आले.

या आंदोलन स्थळावर एंटरटेनमेंट असतं तिथं कॉमेडीयन येऊन गेले आहेत तिथे वेगवेगळे गाणी होतात.आता हे आंदोलन फक्त करमणुकीचे साधन राहिले आहे. रोहित पवार फक्त फार्स करतात, त्यांना लवकरच काँग्रेसमध्ये जायचं यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. त्यांना दिल्लीच्या नेतृत्वाला खुश करायच आहे. महाराष्ट्राचे नवीन पप्पू तयार होत आहेत असं म्हणायला काही हरकत नाही, असं म्हणत आमदार रोहित पवार यांच्यावरती आमदार विक्रम पाचपुते यांनी टीकास्त्र सोडले.

आम्हाला विचारात घेतले नाही तर आम्ही स्वतंत्र लढू : सदाशिव लोखंडे

दरम्यान जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माजी खासदार सदाशिव लोखंडे आणि अरुण मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोखंडे म्हणाले जिल्ह्याची कामधेनू असलेली जिल्हा बँक ही सर्वसामान्यांची बँक आहे. आज आम्ही शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खरं पाहता दुष्काळी परिस्थिती पाहता ही निवडणुक बिनविरोध झाली पाहिजे. त्यासाठी शिवसेनेला विचारात घेतले नाही तर आम्ही स्वतंत्र लढू. असा निर्वाळा असा निर्वाळा माजी खासदार लोखंडे यांनी माजी खासदार आणि जिल्हा बँक संचालक निवडणुकीतील सूत्रधार माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या साक्षीने दिला.

स्वर्गीय कर्डिले साहेबांचा वारसा चालवणार : अक्षय कर्डिले

दरम्यान जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपस्थित माध्यम प्रतिनिधी पत्रकारांशी संवाद साधताना आमदार अक्षय कर्डिले म्हणाले, जिल्हा बँक ही जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांची बँक आहे. या बँकेवर स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी पंधरा वर्षे संचालक म्हणून काम केले तसेच बँकेच्या चेअरमन पदाची धुरा देखील दोन वेळा स्वर्गीय कर्डिले साहेबांनी सांभाळली. या दरम्यान स्वर्गीय कर्डिले साहेबांनी सर्वसामान्य शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी आणि महिला बचत गटाच्या महिलांना बँकेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचे काम केले. कर्डिले साहेबांचा हा वारसा जपण्याचे काम आपण आमदारकीच्या तसेच जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या रूपाने करणार आहोत.