Drought-Affected : नगर : राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती (Drought-like situation) निर्माण झाल्याने पावसाअभावी शेतकरी (Farmers) आणि ग्रामीण भागातील नागरिक अडचणीत सापडले आहेत. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय जिल्हा परिषद अभियंता संघटना, (Zilla Parishad Engineers’ Association) महाराष्ट्र राज्य यांनी घेतला आहे.
नक्की वाचा : पाथर्डी येथील नऊ लाखांच्या लुटीतील दुचाकी सापडली; शिरूर कासारमधून चोरी झाल्याचे उघड
अंदाजे ९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जमा होण्याची अपेक्षा
संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे ४ हजार अभियंता सभासदांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात येणार आहे. यामधून अंदाजे ९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जमा होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय राज्य संघटनेच्या वतीने १० लाख रुपयांची स्वतंत्र आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
150 अभियंत्यांचा या उपक्रमात सक्रिय सहभाग (Drought-Affected)
दुष्काळाच्या संकटात शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यातील अभियंता बांधवांनी एकजुटीने घेतलेला हा निर्णय सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करणारा आहे, असे अध्यक्ष राजू दिघे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता व स्थापत्य अभि. सहाय्यक अशी सुमारे 150 अभियंत्यांचा या उपक्रमात सक्रिय सहभाग आहे.



