Four arrested for robbing passengers : शिर्डी महामार्गावर प्रवाशांना लुटणारे चौघे जेरबंद; कोपरगाव तालुका पोलिसांची कारवाई

Four arrested for robbing passengers : शिर्डी महामार्गावर प्रवाशांना लुटणारे चौघे जेरबंद; कोपरगाव तालुका पोलिसांची कारवाई

0
Four arrested for robbing passengers : शिर्डी महामार्गावर प्रवाशांना लुटणारे चौघे जेरबंद; कोपरगाव तालुका पोलिसांची कारवाई
Four arrested for robbing passengers : शिर्डी महामार्गावर प्रवाशांना लुटणारे चौघे जेरबंद; कोपरगाव तालुका पोलिसांची कारवाई

Four arrested for robbing passengers : नगर : शिर्डीकडे जाणाऱ्या महामार्गावर पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला अडवून बंदुकीसारख्या वस्तूचा व चाकूचा धाक (Threatened with a gun and a knife) दाखवत मोबाईल फोन आणि सोन्याची चैन लुटणाऱ्या टोळीचा कोपरगाव तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी चौघांना अटक (Four arrested for robbing passengers) करण्यात आली असून, त्यांच्याकडून दोन मोबाईल फोन, सोन्याची लेडीज चैन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे.

यांना करण्यात आली अटक

या प्रकरणी काळू उर्फ संतोष शामराव दळवी (३६, रा. हिंगणी), राजू संजय बर्डे (२५, रा. देर्डे चांदवड), किरण बाळू जाधव (२७, रा. देर्डे चांदवड) आणि अमोल राजू राजपूत (२२, रा. कोळपेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मोबाईल, तसेच सोन्याची चैन काढून घेतली (Four arrested for robbing passengers)

या बाबत अजित बुधाजी तोरसकर (वय २८, रा. विरार पूर्व) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ३० एप्रिल २०२६ रोजी पहाटे चारच्या सुमारास तोरसकर हे पत्नीसमवेत दुचाकीवरून शिर्डीकडे दर्शनासाठी जात होते. त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकी वरून आलेल्या तिघांनी त्यांच्या पत्नीच्या पाठीवरील बॅग ओढून त्यांना अडवले. दुचाकी आडवी लावत संशयितांनी बंदुकीसारखी वस्तू व चाकूचा धाक दाखवत दाम्पत्याकडील दोन मोबाईल, तसेच गळ्यातील सोन्याची लेडीज चैन जबरीने काढून घेतली. एवढेच नव्हे तर त्यांच्या दुचाकी चावीही घेऊन आरोपी पसार झाले.

या घटनेनंतर कोपरगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे महेश सिताराम चंदनशिव याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीतील मोबाईल त्याचा साथीदार काळू उर्फ संतोष शामराव दळवी याने दिल्याचे सांगितले. मोबाईल सुरू होत नसल्याने तो परत दिल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली.


दरम्यान, काळू उर्फ संतोष दळवी हा हिंगणी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार हिंगणी-देर्डे चांदवड रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली.


या प्रकरणी काळू उर्फ संतोष शामराव दळवी (३६, रा. हिंगणी), राजू संजय बर्डे (२५, रा. देर्डे चांदवड), किरण बाळू जाधव (२७, रा. देर्डे चांदवड) आणि अमोल राजू राजपूत (२२, रा. कोळपेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून फिर्यादीचे चोरीला गेलेले दोन मोबाईल फोन तसेच सोन्याची लेडीज चैन हस्तगत केली आहे. याशिवाय गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

अटक करण्यात आलेला काळू उर्फ संतोष शामराव दळवी हा पोलिसांच्या नोंदीतील सराईत आरोपी असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दरोडा, फसवणूक, चोरी तसेच आर्म्स ॲक्टअंतर्गत यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. राजू संजय बर्डे याच्याविरुद्धही कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ मधुसूदन दहिफळे, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश तमनर, अंबादास वाघ, जयदीप गवारे, अमोल फटांगरे, राम खारतोडे, रशीद शेख तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर येथील पोहेकॉ सचिन धनाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.