Molestation of underage girls : अल्पवयीन मुलींची छेडछाड; आरोपीला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

Molestation of underage girls : अल्पवयीन मुलींची छेडछाड; आरोपीला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

0
Molestation of underage girls : अल्पवयीन मुलींची छेडछाड; आरोपीला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
Molestation of underage girls : अल्पवयीन मुलींची छेडछाड; आरोपीला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

Molestation of underage girls : नगर : अल्पवयीन मुलींची रस्त्यात छेडछाड (Molestation of underage girls) करून त्यांना शिवीगाळ तसेच मारहाण (Verbal abuse and physical assault) केल्याप्रकरणी विनायक अर्जुन गारुडकर (वय २२, रा. आंधळे चौरे हौसिंग सोसायटी, बोल्हेगाव) याला न्यायालयाने दोषी ठरविले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी आरोपीला एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड, एक महिना कारावास व एक हजार रुपये दंड, तसेच पॉक्सो कायद्याच्या एक वर्ष कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात विशेष सरकारी वकील ॲड. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.

मुलींनी विरोध केल्यानंतर शिवीगाळ

प्रकरणातील माहितीनुसार, लहान मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेत राहून नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या काही अल्पवयीन मुली ८ मार्च २०१४ रोजी शाळेतून रस्त्याने जात होत्या. त्यावेळी विनायक गारुडकर, विकी उर्फ सनी विष्णू शिंदे आणि सावन उर्फ योगेश छगन काळे हे दुचाकीवरून तेथे आले. आरोपींनी मुलींच्या जवळून दुचाकी नेत त्यांना कट मारला आणि अश्लील शेरेबाजी केली. मुलींनी विरोध केल्यानंतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. याचवेळी एका मुलीची ओढणी ओढण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनेची माहिती शिक्षकांना देण्यासाठी एक मुलगी जात असताना आरोपी तिच्या मागे धावत गेला. त्याने तिची ओढणी ओढून तिच्या कंबरेजवळ हात लावला आणि धमकीवजा वक्तव्य केले. त्याचवेळी संस्थेतील एक शिक्षक तेथे आले. त्यांनी आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशीही शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शिक्षकालाही मारहाण (Molestation of underage girls)

आरोपींनी फोन करून आणखी १५ ते २० जणांना तेथे बोलावून घेतल्याचे तपासात समोर आले. या जमावाने शिक्षकाला लाथाबुक्क्यांनी आणि दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यातील एका व्यक्तीने चाकूने शिक्षकाच्या कमरेजवळ वार करून त्यांना जखमी केले. दरम्यान, एका अल्पवयीन मुलीच्या पोटात लाथ मारण्यात आली, तर दुसऱ्या मुलीच्या छातीत बुक्की मारण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विकी उर्फ सनी विष्णू शिंदे, सावन उर्फ योगेश छगन काळे आणि विनायक अर्जुन गारुडकर यांच्यासह १५ ते २० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.


तपासादरम्यान विनायक गारुडकर मिळून न आल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले होते. त्यानंतर इतर दोन आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आणि त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. दरम्यान, गारुडकर पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्याच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात पीडित मुली, वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक आणि तपासी अधिकाऱ्यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि न्यायालयासमोर आलेला पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने गारुडकरला दोषी ठरवत वरील शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश जोशी आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती गुंजाळ यांनी त्यांना सहकार्य केले.