Action by The Anti-Encroachment Squad | नगर : अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमणांविरोधात महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने ( Action by The Anti-Encroachment Squad) गुरुवारी (ता. ८) सकाळी कारवाई केली. जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या टपऱ्या, शेड, पक्के ओटे तसेच विविध फलक हटविण्यात आले.
हे वाचा – अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकारविरोधात इंडिया आघाडीचा धडक मोर्चा

सकाळी कारवाई ( Action by The Anti-Encroachment Squad)
महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण प्रमुख आदित्य बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग अधिकारी शाम गोडाळकर आणि क्षेत्रीय अधिकारी अर्जुन जाधव यांच्या उपस्थितीत सकाळी साडेसातच्या सुमारास कारवाईला सुरुवात झाली.
अवश्य वाचा – दुष्काळग्रस्त भागातील साखर कारखाने तातडीने बंद करा; प्रहार दिव्यांग संघटनेची मागणी

अतिक्रमणे हटविण्याचे काम ( Action by The Anti-Encroachment Squad)
बालिकाश्रम रोडवरील परिसरासह रस्त्याच्या कडेला करण्यात आलेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेचे पथक दाखल झाले होते. जेसीबी मशीन, दोन डंपर आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने अतिक्रमणे हटविण्याचे काम करण्यात आले.

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अनधिकृत अतिक्रमणांविरोधात कारवाई सुरू ठेवण्यात येईल असे, महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.



