Chavan Murder Case | नगर : दुचाकीचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून धारदार शस्त्राने रवींद्र रामभाऊ चव्हाण (वय ५५, रा. भिंगारदिवे मळा, भुतकरवाडी, सावेडी, अहिल्यानगर) यांची हत्या ( Chavan Murder Case ) करण्यात आली. ही घटना मंगळवारी (ता.७) सायंकाळी साडेचारच्या सुमारास बालिकाश्रम रस्त्यावरील न्यू आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या मागील गेटसमोर घडली.
हे वाचा – अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकारविरोधात इंडिया आघाडीचा धडक मोर्चा

खुनाचा गुन्हा दाखल ( Chavan Murder Case )
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज रवी सोनवणे, प्रेम रवी सोनवणे (दोघे रा. सिद्धार्थनगर, अहिल्यानगर) व त्यांच्या अन्य अनोळखी साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा – दुष्काळग्रस्त भागातील साखर कारखाने तातडीने बंद करा; प्रहार दिव्यांग संघटनेची मागणी
धारदार शस्त्राने वार ( Chavan Murder Case )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र चव्हाण यांच्या दुचाकीला कट संशयित आरोपींच्या दुचाकीला लागला. या घटनेत एका आरोपीची चप्पल तुटली. याच कारणावरून आरोपींच्या मनात राग निर्माण झाला. त्यानंतर आरोपींनी चव्हाण यांच्याशी वाद घालत धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात चव्हाण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष मुटकुळे, आणि तोफखाना पोलीस ठाण्याचे बालाजी वैद्य यांनी घटनास्थळी भेट देत आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. हल्ल्यात वापरण्यात आलेले शस्त्र अद्याप जप्त झाले नसून, गुन्ह्यातील इतर अनोळखी साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.



