Kotwali Police : नऊ वर्षांपासून अत्याचाराच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी जेरबंद; कोतवाली पोलिसांची श्रीगोंद्यात कारवाई

ओळख लपवून वास्तव्य केल्याची माहिती

0
Kotwali Police : नऊ वर्षांपासून अत्याचाराच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी जेरबंद; कोतवाली पोलिसांची श्रीगोंद्यात कारवाई
Kotwali Police : नऊ वर्षांपासून अत्याचाराच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी जेरबंद; कोतवाली पोलिसांची श्रीगोंद्यात कारवाई

Kotwali Police : नगर : अत्याचाराच्या गुन्ह्यात २०१७ पासून फरार (Absconding) असलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) श्रीगोंदा येथून अटक केली. रिपुस ऊर्फ इपुस मेहरा भोसले (रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. श्रीगोंदा येथील शनी चौक परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले.

नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकारविरोधात इंडिया आघाडीचा धडक मोर्चा

२०१७ मध्ये गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोतवाली पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील रिपुस भोसले हा तेव्हापासून फरार होता. त्याने आपली ओळख लपवून वास्तव्य केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पाहिजे आणि फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी १ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्याचे आदेश अपर पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातही पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. या मोहिमेदरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना रिपुस भोसले हा श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल चिटणीस आणि पथकाला कारवाईच्या सूचना देण्यात आल्या. पथकाने श्रीगोंदा पोलिसांच्या मदतीने शनी चौक परिसरात शोध घेतला असता, तेथे एक संशयित आढळून आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पुढील तपास सुरू (Kotwali Police)

चौकशीदरम्यान त्याने आपले नाव रिपुस ऊर्फ इपुस मेहरा भोसले असल्याचे सांगितले. खात्री केल्यानंतर त्याला कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तो २०१७ पासून संबंधित गुन्ह्यात फरार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांनी त्याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बाळकृष्ण दौंड, साबीर शेख, राहुल शिंदे, विनोद बोरगे, विशाल दळवी, शिरीष तरटे, सुरज कदम, अतुल कोतकर, संदिप शिरसाठ, संकेत धिवर, अतुल लाटे, पोकों वैभव काळे, आकाश काळे व सत्यम शिंदे तसेच दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू व अरुण सांगळे यांच्या पथकाने केली आहे.