
भक्तिपूर्ण वातावरणात भाविकांची दर्शनासाठी रीघ
Burhannagar Shri Tuljabhavani Devi Temple : नगर : बुऱ्हाणनगर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिरात (Burhannagar Shri Tuljabhavani Devi Temple) रविवार दि.११/१०/२०२६ रोजी सकाळी नवरात्रौत्सवास (Navratri Festival) भक्तिपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. यानिमित्ताने मंदिरातील तुळजाभवानी देवीची सकाळी महापूजा, अभिषेक करून ध्वजारोहणा करून विधिवत घटस्थापना (Ghatsthapana) देवीचे पुजारी विजय भगत आणि कुटुंबीयांनी केली. ‘आईराजा उदो उदो…सदानंदीचा उदो उदो…, तुळजाभवानी देवी की जय… असा देवीचा जयघोष उपस्थित भाविकांनी केला. शारदीय नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनास भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे.
तुळजाभवानी देवीचा जयजयकार करत मंदिराला प्रदक्षिणा
घटस्थापणे पूर्वी पुजारी भगत परिवारातील महिलांनी डोक्यावर सजवलेले घट व पुरुषांनी भगवे ध्वज, अबकारी हातात घेत तुळजाभवानी देवीचा जयजयकार करत मंदिराला प्रदक्षिणा मारली. या प्रदक्षिणे नंतर मंदिराचे मुख्य पुजारी ॲड. विजय भगत, सौ.दुर्गा भगत, ॲड. अभिषेक भगत व यांनी कुणाल भगत राजेंद्र भगत, अंजली भगत, किरण भगत, मनीषा भगत, सुभाष भगत, सुनंदा भगत, कविता भगत, रोहन भगत, ॲड.अजिंक्य भगत, वैभवी भगत, अंकिता भगत, ॲड.संकेत भगत, अक्षदा भगत, वेदिका भगत, क्षताक्षी व वेद भगत यांनी मंदिरात विधिवत घटस्थापना करून देवीची महाआरती केली. नवरात्राैत्सवानिमित्त तुळजाभवानी देवीची मूर्ती सुवर्ण अलंकारांनी मढण्यात आली होती. तसेच विविध फुलांच्या माळांनी देवीचे रूप अधिकच प्रसन्न वाटत होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
१० दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन (Burhannagar Shri Tuljabhavani Devi Temple)
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी देवी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसरातही सजावट करण्यात आली आहे. देवीच्या मुखदर्शनाची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. दिवसातील २० तास भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. नवरात्रोत्सवा निमित्त पुढील १० दिवस भरगच्च धार्मिक आणि आरोग्य शिबिराचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तुळजाभवानी देवीचे दर्शन श्री बुऱ्हाणनगर देवी या पेजवर सर्व समाज माध्यमांवर उपलब्ध आहे, अशी माहिती मंदिराचे पुजारी ॲड.अभिषेक भगत यांनी देवून सर्व भाविकांनी येथील धार्मिक कार्याक्रमांचा व देवीच्या दर्शनचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
तुळजाभवानी देवीच्या दैनंदिन पुजेची माहिती कुणाल भगत यांनी दिली. यावेळी प्रांत संघ चालक नानासाहेब जाधव , विभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, भिंगार कैंप पोलीस निरीक्षक थोरात मॅडम , रोटरी क्लब चे सर्व सदस्य, डॉक्टर्स आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उस्पस्थित होते.


