Illegal Sand Mining : पाथर्डी येथील रुद्रा नदीपात्रात अवैध वाळू उपसा; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

स्थानिक गुन्हे शाखेची मध्यरात्री कारवाई; सहा जणांविरुद्ध गुन्हा, एक जण फरार

0
Illegal Sand Mining : पाथर्डी येथील रुद्रा नदीपात्रात अवैध वाळू उपसा; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Illegal Sand Mining : पाथर्डी येथील रुद्रा नदीपात्रात अवैध वाळू उपसा; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Illegal Sand Mining : पाथर्डी : तालुक्यातील हनुमान टाकळी व कासार पिंपळगाव शिवारातील रुद्रा नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा (Illegal Sand Mining) करून वाहतूक केली जात असल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) कारवाईत उघडकीस आला. यावेळी पोलिसांनी छापा टाकून दोन डंपर, एक जेसीबी आणि एक ट्रॅक्टर असा सुमारे ६० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी एक जण पसार आहे.

यावेळी पोलिसांनी छापा टाकून दोन डंपर, एक जेसीबी आणि एक ट्रॅक्टर असा सुमारे ६० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी एक जण पसार आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या आदेशानुसार पथक पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत होते. त्यावेळी हनुमान टाकळी गावच्या शिवारातील रुद्रा नदीपात्रातून जेसीबीच्या साहाय्याने डंपरमध्ये वाळू भरून तिची विनापरवाना वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला.

नक्की वाचा : साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

ट्रॅक्टरमध्ये वाळू भरली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास

यावेळी वैभव बंडू डांगे (वय २२, रा. डांगेवाडी, ता. पाथर्डी) याच्या ताब्यातील डंपरमध्ये अंदाजे अर्धा ब्रास वाळू आढळली. त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे समोर आले. त्यानंतर नदीपात्रात पाहणी केली असता, तेथे जेसीबीच्या साहाय्याने डंपर व ट्रॅक्टरमध्ये वाळू भरली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.या कारवाईत ऋषिकेश अंकुश मोरे (वय २८), बंडू शिवाजी बर्डे (वय ४५), सोमनाथ जगन्नाथ डांगे (वय २८), वैभव बंडू डांगे आणि प्रवीण उत्तम शिरसाठ (वय २९) यांच्यासह सतीश ऐडके (पूर्ण नाव माहीत नाही, रा. पाथर्डी-शेवगाव रोड) यांची नावे फिर्यादीत नमूद करण्यात आली आहेत. यापैकी सतीश ऐडके हा फरार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

६० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत (Illegal Sand Mining)

पोलिसांनी कारवाईदरम्यान सुमारे १५ लाख ५ हजार रुपये किमतीचा टाटा कंपनीचा डंपर, २५ लाख रुपये किमतीचा जेसीबी, १५ लाख २० हजार रुपये किमतीचा दुसरा डंपर आणि ५ लाख ५ हजार रुपये किमतीचा न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर, तसेच त्यामधील अंदाजे तीन ब्रास वाळू जप्त केली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ६० लाख ३० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी बाळासाहेब खेडकर यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.