Ahilyanagar News : जम्मू विमानतळावर थरार! नगरच्या भाविकांचा विमानात जीव टांगणीला

0
Ahilyanagar News : जम्मू विमानतळावर थरार! नगरच्या भाविकांचा विमानात जीव टांगणीला

नगर :  विमान हवेत घिरट्या घालतंय, त्यात पाऊस आणि खराब हवामानामुळे वैमानिकाला धावपट्टी दिसेना! हो असं घडलंय, वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या अहिल्यानगरच्या भाविकांसोबत, जम्मू विमानतळावर (Jammu Airport) काळजाचा ठोका चुकवणारा अनुभव अहिल्यानगरच्या (Ahilyanagar News)भाविकांना आलाय.अखेर चौथ्या प्रयत्नात विमानाचं सुखरूप लँडिंग (Aircraft landing) करण्यात आलं आहे.

नक्की वाचा : ध्रुव राठीसह अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात? नेमकं काय घडलं?

नेमकं काय घडलं? (Ahilyanagar News)

वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या अहिल्यानगरच्या भाविकांचा विमानप्रवास जम्मू विमानतळावरील खराब हवामानामुळे थरारक ठरलाय. ढगाळ वातावरण, मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे विमान उतरविण्याचे वैमानिकाचे प्रयत्न अयशस्वी ठरत होते. विमान हवेत घिरट्या घालत असताना प्रवाशांच्या मनात भीतीचे काहूर माजले होते. मात्र, वैमानिक कॅप्टन समीर मल्होत्रा यांच्या कुशलतेमुळे चौथ्या प्रयत्नांत विमान जम्मू विमानतळावर सुखरूप उतरवले आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला. 

अवश्य वाचा : रहस्य आणि स्त्रीशक्तीचा संगम; ‘दशमी’च्या गाण्यात दिसणार गौरी इंगवलेचा रौद्र अवतार

जय मातादी ग्रुपच्या वतीने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील ५५ भाविक पुणे आणि दिल्लीमार्गे जम्मूला निघाले होते. ग्रुपचे प्रमुख नाना भवर, नगरसेवक निखिल वारे, एमआयडीसीतील आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, उद्योजक किसन सातपुते, महेंद्र उपाध्ये, अॅड. संदीप भोगाडे, मधुकर चौधरी, कैलास गाडीलकर यांच्यासह प्रवासी साडेसात वाजता विमानाने दिल्ली येथून जम्मूला निघाले होते. मात्र, जम्मू विमानतळाजवळ पोहोचताच खराब हवामानामुळे प्रवासाला अनपेक्षित वळण मिळाले. जम्मू विमानतळावर ढगाळ वातावरण आणि जोरदार पावसामुळे विमान उतरविण्यात अडचणी येत असल्याचे वैमानिकाने प्रवाशांना सांगितले. विमान उतरविण्याचे सुरुवातीचे प्रयत्न अयशस्वी झाले. अमृतसर आणि चंदीगढच्या दिशेने विमान नेण्याचाही विचार करण्यात आला. 

वैमानिकाच्या प्रयत्नाने सुखरूप लँडिंग (Ahilyanagar News)

प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्याने विमान पुन्हा दिल्लीच्या दिशेने वळवावे लागण्याची शक्यता वैमानिकाने व्यक्त केली होती, खिडकीबाहेर दिसणारे दाट ढग आणि विमान उत्तरविण्याचे वारंवार अपयशी ठरणाऱ्या प्रयत्नांमुळे प्रवाशांच्या मनात भीती निर्माण झाली. नेहमी विमान प्रवास करणारे प्रवासीही शांत होते. प्रत्येक जण पुढे काय होणार याची प्रतीक्षा करत होता. काही जण अक्षरशः मान खाली घालून बसले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. मात्र अशा परिस्थितीत वैमानिकाने धीर न सोडता विमान उत्तरविण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर चौथ्या प्रयत्नांत कॅप्टन मल्होत्रा यांनी ते श्रीनगरमार्गे जम्मू विमानतळावर उतरवण्याचा प्रयत्न सुरू केला. सुमारे दहा मिनिटांच्या प्रयत्नानंतर वातावरणात बदल झाला. दृश्यमानता समाधानकारक होती. त्यामुळे विमान उत्तरविण्यात यश आले आणि अहिल्यानगरच्या भाविकांनी सुटकेचा निःश्वास सोडलाय.