
Bhagwangad : पाथर्डी : बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथील श्री संत भगवान बाबा यांच्या जन्मस्थळी असलेल्या भगवान भक्तीगडावर (Bhagwangad) २० ऑक्टोबर रोजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या मार्गदर्शनाखाली दसरा मेळावा (Dussehra Rally) आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास पाथर्डी तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक आणि ऊसतोड कामगार सहभागी व्हावेत, यासाठी पाथर्डी येथे नियोजन बैठकीचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते.पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर ज्येष्ठ नेते अशोक चोरमले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मेळाव्यासाठीची वाहतूक व्यवस्था, प्रसिद्धी आणि गावनिहाय नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे, ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार शेळके, डॉ. मृत्युंजय गर्जे, सुभाष बोरुडे, अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, बंडू पठाडे, अॅड. प्रतीक खेडकर, संजय देशमुख, प्रतीक नांगरे, माणिक खेडकर, प्रा. सुनील पाखरे, राजेंद्र दगडखैर, आजिनाथ मोरे, अक्षय काळे, वामन कीर्तने, मनीषा उदमले, वंदना टेके, पिराजी कीर्तने, विनायक कीर्तने, रामहरी खेडकर, नितीन गर्जे, सुरेश नागरे, अमोल भाबड, अमित चौनापुरे, अभिजीत इथापे नवनाथ ढाकणे, आदी उपस्थित होते.
नक्की वाचा : दुष्काळग्रस्त भागातील पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचा सुरळीत पुरवठा; वितरणासाठी प्रशासन सज्ज

बसेसची व्यवस्था
दसरा मेळाव्यासाठी तालुक्यातील विविध गावांतून भाविक आणि कार्यकर्त्यांना सावरगाव घाट येथे घेऊन जाण्यासाठी एसटी बसेसचे नियोजन करण्यात येणार आहे. ठिकाणे निश्चित करून तेथून बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच सोशल मीडिया आणि फ्लेक्स फलकांच्या माध्यमातून मेळाव्याची प्रसिद्धी करण्यात येणार आहे. गावागावांतील प्रमुख कार्यकर्त्यांशी संपर्क साधून अधिकाधिक नागरिक, कार्यकर्ते आणि ऊसतोड कामगारांनी मेळाव्यास उपस्थित राहावे, यासाठी नियोजन केले जाणार आहे. या नियोजनासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे आणि आमदार मोनिका राजळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अशोक चोरमले म्हणाले की (Bhagwangad)
अशोक चोरमले म्हणाले की, भगवानगडावरील दसरा मेळाव्याची सुरुवात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी केली. या मेळाव्यात समाजातील सर्व घटकांना सामावून घेत विविध विचारांच्या मान्यवरांना व्यासपीठावर बोलावण्याची परंपरा त्यांनी जपली. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांकडे गोपीनाथ मुंडे यांचे विशेष लक्ष होते. हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत आणि सावरगाव येथील दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
नगराध्यक्ष अभय आव्हाड म्हणाले, की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला दसरा मेळावा लोकनेत्या पंकजा मुंडे यांनी पुढे सुरू ठेवला आहे. हा मेळावा सुपे सावरगाव येथे होत असून, शेवगाव पाथर्डी येथील मिळवण्यासाठी जाणाऱ्या लोकांच्या बाबतचे माजी खासदार डॉ. सुजय विखे आणि आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात येत आहे. पाथर्डी तालुक्यातून अधिकाधिक कार्यकर्ते, नागरिक आणि ऊसतोड कामगार मेळाव्यास उपस्थित राहतील, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. बैठकीत सोपविण्यात आलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक मुकुंद गर्जे यांनी केले, तर माणिक खेडकर यांनी आभार मानले. भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यास पाथर्डी तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


