
Water Supply via Tankers : नगर: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा (Water Supply via Tankers) सुरू आहे. जिल्ह्यातील १६१ गावांमधील ९६१ वाड्या-वस्त्यांना तब्बल १६९ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातोय.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा दिलासा (Water Supply via Tankers)
यामुळे ३ लाख ३१ हजारांहून अधिक नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा दिलासा मिळतोय. तर पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक ७४ टँकरद्वारे ६२ गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील कर्जत, शेवगाव आणि नगर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे… तसेच पाणी जपून वापरण्यास आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

पारनेर तालुक्यात ४ गावांतील ३१ वाड्या-वस्त्यांसाठी ५ टँकर, संगमनेर तालुक्यात ८ गावांतील १६ वाड्या-वस्त्यांसाठी ७ टँकर, नेवासा तालुक्यात २ गावांतील १८ वाड्या-वस्त्यांसाठी २ टँकर आणि जामखेड तालुक्यात ६ गावांतील ७ वाड्या-वस्त्यांसाठी ८ टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. श्रीगोंदा तालुक्यात ४ गावांतील ४९ वाड्या-वस्त्यांना ४ टँकरद्वारे, तर नगर परिषद पारनेर क्षेत्रात १ गावातील ३१ वाड्या-वस्त्यांना ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.


