Anandotsav Trust : नगर : नगरमध्ये ‘संतसाहित्य व परंपरा’ या विषयावर जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे (District-level Literary Meet) २४ व २५ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा विभाग, साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या आर्थिक योगदानातून व नगरच्या आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट (Anandotsav Trust) संचालित श्री ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग सामूहिक चिंतन महाप्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने हे संत साहित्य संमेलन होत आहे. दोन दिवसीय जिल्हास्तरीय या साहित्य संमेलनात आनंदोत्सव ट्रस्टच्या वैशिष्ट्यपूर्ण पुरस्कारांचे वितरण (Distribution of Awards) व संत साहित्यविषयक विविध ग्रंथांचा प्रकाशन सोहळा होणार असल्याची माहिती, संमेलनाचे स्वागताध्यक्ष सतीश तथा आबा मुळे यांनी दिली.
नक्की वाचा : भगवान गडावरील दसरा मेळाव्यासाठी पाथर्डीत नियोजन बैठक; सोशल मीडिया व फ्लेक्सद्वारे प्रचारावर भर
२४ ऑक्टोबर रोजी पुरस्कारांचे वितरण
संमेलनाचे सह-स्वागताध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित यांनी सांगितले, या संमेलनात आनंदोत्सव ट्रस्टचा राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठाप्राप्त अशा जीवनगौरव पुरस्कार अकोल्याच्या अगस्तिऋषी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. के. डी. धुमाळ यांना जाहीर झाला आहे. तसेच देवाची आळंदी येथील ह.भ.प. उमेश बागडे महाराज यांना संप्रदाय संघटन व प्रबोधनविषयक पुरस्कार, नेवास्याचे जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे यांना संत साहित्य संशोधन पुरस्कार तर इसळक (नगर) येथील प्रा. गौतम कराळे यांना गोवंश व पर्यावरण संवर्धन ‘संत कार्य गौरव’ पुरस्काराने गौरवित करण्यात येणार आहे.
यासर्व पुरस्कारांचे वितरण २४ ऑक्टोबर रोजी संमेलांच्या उद्घाटन सोहळ्यात होणार आहे. तसेच ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग महाप्रकल्पातून सिद्ध झालेल्या ‘श्री ज्ञानेश्वरी चिंतन खंड १ – तत्त्वज्ञान प्रबपोध व खंड २ जीवन प्रबोध’ या द्विखंडात्मक ३१०० पृष्ठांच्या वीहा पब्लिकेशन्स प्रकाशित ऐतिहासिक बृहद्ग्रंथाचे स्वागत केले जाणार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
संत पायिकांना गौरविले जाणार (Anandotsav Trust)
संमेलांचे कार्यध्यक्ष डॉ.दिलीप धनेश्वर यांनी सांगितले, संमेलनाच्या द्वितीय दिवशी २५ ऑक्टोबर रोजी सांस्कृतिक कार्य गौरव’ या विशेष पुरस्काराने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजकुमार जोशी (बन्सीमहाराज) यांना सन्मानित केले जाणार आहे. तसेच ‘संत पायिक गौरव’ पुरस्काराने ह.भ.प. राम झिंजुर्के महाराज (शेवगाव-आखेगाव), प्रभा भोंग व हिरा मोकाटे (नगर शहर), डॉ.सुभाष शेकडे महाराज (पाथर्डी), हनुमंत निकम महाराज (जामखेड), अॅड. अरुण पुंडे महाराज (कर्जत-राशीन), भूषण महापुरुष महाराज व अशोक आळेकर महाराज (श्रीगोंदा),
तुळशीराम लबडे महाराज (नगर तालुका), बाळकृष्ण कांबळे महाराज (राहुरी-ताहाराबाद), नवनाथ म्हस्के महाराज (बाभळेश्वर), निवृत्ती भागीत महाराज (अकोले-कातळापूर), दीपक देशमुख महाराज (अकोले), डॉ. अर्जुन साळुंके महाराज (कोपरगाव), दत्ता भोर महाराज (संगमनेर), सेवानाथ खोकर महाराज श्रीरामपूर), रामायणाचार्य नंदकिशोर खरात महाराज (नेवासा), शिवाजी रेपाळे महाराज (पारनेर) आणि दिव्यांगावर मात करून आत्मोद्धाराबरोबरच प्रबोधन सेवा करणारे बाळकृष्ण खांदे महाराज या संत पायिकांना गौरविले जाणार आहे.
संमेलांच्या सांगता सोहळ्यात प्रा.डॉ. अशोक लिंबेकर लिखित ‘कैवल्याचे चांदणे’, डॉ. दिलीप धनेश्वर लिखित ‘श्री ज्ञानेश्वर स्वाध्याय विवेक’, प्रकाश लासुरे, प्रा. रंगराव भामरे, भाऊसाहेब पागिरे व राम विद्यासागर यांच्या सामूहिक चिंतनासह दत्ता भालेराव लिखित ‘संत ज्ञानेश्वरांचा सामरस्य विचार’, व ह.भ.प. भागवत महाराज लिखित ‘श्रीमद् भागवत रसामृत’ तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत संपादित ‘पंच परिवर्तन’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.



