Local Crime Branch : पाथर्डीत चाकूचा धाक दाखवून दोन लाखांची बॅग लुटली; स्थानिक गुन्हे शाखेकडून चारजण ताब्यात

काही संशयित पसार असून, त्यांचा शोध सुरू

0
Local Crime Branch : पाथर्डीत चाकूचा धाक दाखवून दोन लाखांची बॅग लुटली; स्थानिक गुन्हे शाखेकडून चारजण ताब्यात
Local Crime Branch : पाथर्डीत चाकूचा धाक दाखवून दोन लाखांची बॅग लुटली; स्थानिक गुन्हे शाखेकडून चारजण ताब्यात

Local Crime Branch : नगर : प्लॉट विक्रीतून मिळालेली रक्कम घेऊन जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चाकूचा धाक दाखवून तसेच हातावर वार करून पैशांची बॅग लुटल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) छडा लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना ताब्यात (In Custody) घेतले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व मोबाईलसह एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यातील आणखी काही संशयित पसार (Absconding) असून, त्यांचा शोध सुरू आहे.

नक्की वाचा : आनंदोत्सव ट्रस्टच्या पुरस्कारांची घोषणा

पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पाथर्डी येथील क्रांती चौक परिसरात १ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. दिपक सुधाकर येळाई (वय ६२, रा. मेन रोड, क्रांती चौक, पाथर्डी) हे प्लॉट विक्रीतून मिळालेली रक्कम घेऊन जात असताना दोन विनाक्रमांकाच्या दुचाक्यावरून आलेल्या चौघांनी त्यांना अडविले. आरोपींनी त्यांच्या हातावर लोखंडी सुर्‍याने वार केला आणि कुकरीचा धाक दाखवून पैशांची बॅग जबरीने हिसकावून नेली.

याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना या गुन्ह्यातील संशयित मुदस्सर ऊर्फ मुज्जु सादिक सय्यद हा माणिकदौंडी रस्त्यावरील एम. एम. निऱ्हाळी हायस्कूलजवळ असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी सुरज संतोष वडागळे, आकाश शरद हराळे आणि इसाक पापा शेख यांनाही ताब्यात घेतले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

काही संशयित पसार (Local Crime Branch)

चौकशीदरम्यान मुदस्सर याने लुटलेल्या रकमेपैकी दोन लाख रुपये आपल्या वाट्याला आल्याचे सांगितले. त्यापैकी ३० हजार रुपये खर्च केले असून उर्वरित रक्कम घरी ठेवल्याची माहिती त्याने दिली. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष एक लाख ७० हजार रुपये रोख, एक पिशवी आणि दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण एक लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या गुन्ह्यात साहिल खान (रा. तिसगाव), राजू ठाकूर (रा. दिल्ली), विशाल ब्राम्हणे, सोमनाथ रमेश काळोखे यांच्यासह अन्य काही जणांचा सहभाग असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

यातील काही संशयित पसार असून, त्यांचा शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. ताब्यातील आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.