Burglary in Kedgaon : केडगावमध्ये घरफोडी, साडेआठ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; दोन संशयितांकडून मुद्देमाल हस्तगत

Burglary in Kedgaon : केडगावमध्ये घरफोडी, साडेआठ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; दोन संशयिकांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Burglary in Kedgaon : केडगावमध्ये घरफोडी, साडेआठ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; दोन संशयितांकडून मुद्देमाल हस्तगत
Burglary in Kedgaon : केडगावमध्ये घरफोडी, साडेआठ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; दोन संशयितांकडून मुद्देमाल हस्तगत

Burglary in Kedgaon : नगर : नवीन घर पाहण्यासाठी आईसोबत बाहेर गेलेल्या महिलेच्या घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना केडगाव (Burglary in Kedgaon) परिसरातील भूषणनगर येथे उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे ८ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे कडे आणि अंगठी चोरीला गेल्याची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी विराज सचिन रोडे आणि विवेक विजय वहाडणे (दोघे रा. अंबिकानगर, केडगाव) यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोतवाली पोलिसांनी तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या साहाय्याने जलद तपास केला. त्यांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सायंकाळी पाचच्या सुमारास चाेरी

श्रद्धा विठ्ठलराव जाधव (वय २९, रा. छत्रपती टॉवर, श्रीराम चौक, भूषणनगर, केडगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास त्या आई बेला जाधव यांच्यासोबत नवीन घर पाहण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी घराला बाहेरून कडी लावण्यात आली होती. घरात त्यांची बहीण आणि मुलगा साई होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

ओळखीच्या दाेघांनी चाेरी केल्याचा आराेप (Burglary in Kedgaon)

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बहीण घरी असताना तिच्या ओळखीचा विराज रोडे हा मित्र विवेक वहाडणे याच्यासह घरी आला. पाणी पिण्याच्या बहाण्याने दोघे स्वयंपाकघराकडे गेले. त्यानंतर बहिणीची नजर चुकवून ते बेडरूममध्ये गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. काही वेळाने दोघेही घाईघाईने बेडरूममधून बाहेर येताना दिसले. त्यावेळी विवेक हा खिशात काहीतरी लपवत असल्याचे बहिणीच्या निदर्शनास आले. तिने विचारणा केली असता, काही नसल्याचे सांगून दोघेही तेथून निघून गेले.

यानंतर बहिणीने बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता कपाटाच्या ड्रॉवरमध्ये उचकापाचक झाल्याचे दिसले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास श्रद्धा जाधव आणि त्यांची आई घरी परतल्यानंतर त्यांनी कपाटाची तपासणी केली. त्यावेळी ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.


चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये सुमारे साडेपाच तोळे वजनाचे, स्वस्तिक फुलाची डिझाइन असलेले सोन्याचे कडे (किंमत अंदाजे ८ लाख २५ हजार रुपये) आणि खड्यांची डिझाइन असलेली २.५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत अंदाजे ३७ हजार ५०० रुपये) यांचा समावेश आहे. या दोन्ही दागिन्यांची एकूण किंमत ८ लाख ६२ हजार ५०० रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

घराला बाहेरून कडी लावलेली असताना ती उघडून घरात प्रवेश करत कपाटातील दागिने चोरीला गेल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगाने तपास सुरु केला. त्यांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल चिटणीस हे करत आहेत.