Shrirampur News: श्रीरामपूर हादरले;‘जादुई दिव्या’ चा फंडा दाखवून व्यावसायिकाची सव्वा कोटीची फसवणूक

0
Shrirampur News: श्रीरामपूर हादरले;‘जादुई दिव्या’ चा फंडा दाखवून व्यावसायिकाची सव्वा कोटीची फसवणूक

नगर : आमच्याकडे नैसर्गिक वीज पडलेले भांडे आहे, हे भांडे म्हणजे एक प्रकारचा जादुई दिवा असतो. त्यात अत्यंत मौल्यवान असे मूलद्रव्य तत्व तयार झालेले आहे, इस्रोचे वैज्ञानिक ते पाहण्यासाठी येणार आहेत, अशा भांड्यांचे आपल्याला कोट्यवधी रुपये मिळतील, असे अमिष दाखवून श्रीरामपूर (Shrirampur News) येथील व्यावसायिकाला दोघांनी १ कोटी १८ लाख ७ हजार रुपयांना गंडा (Businessman swindled out of crores) घातला आहे. आता नेमकं काय घडलं? ते पाहू…

नक्की वाचा : जम्मू विमानतळावर थरार! नगरच्या भाविकांचा विमानात जीव टांगणीला

प्रकरण काय? (Shrirampur News)

नितीन बाळासाहेब लांडे (रा. मोरगेवस्ती, श्रीरामपूर) यांनी १२ ऑक्टोबरला येथील शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गोरख जेधे, सूरज जाधव (पूर्ण नाव माहित नाही, रा. दोघे श्रीरामपूर) यांच्यासह इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लांडे यांची २०२३ मध्ये चिपळून येथील अनंत नावाच्या व्यक्तीशी कामानिमित्त ओळख झाली होती. त्यानंतर तो श्रीरामपुरात आला. अनंतने त्याचे मित्र गोरख जेधे व सूरज जाधव व आणखी एकासोबत मिळून लांडे यांना सांगितले की, आमच्याकडे एक वीज पडलेले भांडे आहे. अशा प्रकारचे भांडे परदेशी कंपन्या त्याच्यातील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे कोट्यवधी रुपयांना विकत घेतात. तसेच लांडे यांचा विश्वास पटावा, यासाठी आरोपींनी आपल्याकडे काही वैज्ञानिक असल्याचे भासवून लांडे यांना त्यांच्याशी बोलायला लावले.  

अवश्य वाचा : ध्रुव राठीसह अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात? नेमकं काय घडलं?

१ कोटी १८ लाख ७ हजार रुपयांची फसवणूक (Shrirampur News)

या कामामध्ये जर पैसे गुंतवले तर पाच ते दहा पट परतावा मिळेल,असे सांगितले. तसेच या वस्तूच्या देखभालीसाठी मोठा खर्च लागतो, असे सांगून आरोपींनी लांडे यांच्याकडून २०२३ ते एप्रिल २०२६ पर्यंत वेळोवेळी रोख व ऑनलाइन स्वरुपात असे एकूण १ कोटी १८ लाख ७ हजार घेतले. त्यानंतर आरोपींना पैशांबाबत विचारणा केली असता त्यांनी लांडे यांना मारहाण केली,असे फिर्यादीत म्हटले आहे. हे आरोपी गोरख जेथे व सूरज जाधव हे आधीच्या गुन्ह्यात कारागृहात आहेत.

आता फसवणुकीच्या गुन्ह्यात त्यांना वर्ग करून घेतले जाणार आहे. या प्रकरणी पोलिस तपास सहाय्यक असलेले पोलिस निरीक्षक अप्पासाहेब हंडाळ हे करत आहेत. श्रीरामपूर शहर पोलिसांशी याबाबत संपर्क साधला असता, यातील एक आरोपी कोकणातील चिपळूणमधून पोलिसांनी पकडून आणला आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.