Vikram Pachpute on Sushma Andhare : ‘बेरोजगार सुषमाताईंचा पुन्हा एकदा अभ्यास कमी पडला’; विक्रम पाचपुते यांची टीका

0
Vikram Pachpute on Sushma Andhare : 'बेरोजगार सुषमाताईंचा पुन्हा एकदा अभ्यास कमी पडला'; विक्रम पाचपुते यांची टीका

नगर : आमच्या बेरोजगार सुषमाताईंचा पुन्हा एकदा अभ्यास कमीच पडला अशी टीका भाजप आमदार विक्रम पाचपुते (Vikram Pachpute on Sushma Andhare) यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंवर टीका केली. कामगार आयुक्त कार्यालयाच्या गट-क परीक्षेसंदर्भात सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्यावर पाचपुते यांनी प्रत्युत्तर (Reply) दिलं आहे. संबंधित परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेलीच नाही,असे आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट करण्यात आल्याचा दावा देखील विक्रम पाचपुतेंनी केला आहे.

नक्की वाचा : जामखेडमध्ये युवकावर कोयत्याने हल्ला, मनगटापासून तुटला हात; कारण काय?

विक्रम पाचपुते नेमकं काय म्हणाले? (Vikram Pachpute on Sushma Andhare)

सुषमाताई, तुमचा अभ्यास कमी पडतोय की, तुम्ही जाणीवपूर्वक फेक नॅरेटिव्ह पसरवत आहात? असा सवाल विक्रम पाचपुते यांनी केला. अभ्यासाच्या अभावामुळेच कदाचित सुषमाताईंवर बेरोजगार राहण्याची वेळ आली असावी, असा खोचक टोला देखील पाचपुते यांनी लगावला. शिळ्या कढीला ऊत आणण्यापेक्षा सुषमाताईंनी आधी अभ्यास करावा असे ते म्हणाले. कोणताही आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थिती तपासावी. दिशाभूल करणारी वक्तव्ये करु नयेत, असे आमदार विक्रम पाचपुते म्हणाले. आता भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी केलेल्या टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे काय प्रत्युत्तर देणारे हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा : जम्मू विमानतळावर थरार! नगरच्या भाविकांचा विमानात जीव टांगणीला

सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या? (Vikram Pachpute on Sushma Andhare)

देशभरात पेपरफुटीचे आणि भरती परीक्षांमधील घोटाळ्यांचे सत्र सुरू असतानाच आता महाराष्ट्रात कामगार आयुक्तालया मार्फत घेण्यात आलेल्या माथाडी निरीक्षक पदाच्या भरतीत मोठा गैरप्रकार झाल्याचा खळबळजनक आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केला. नागपूरच्या एकाच परीक्षा केंद्रावरून तब्बल २४ विद्यार्थी टॉपर कसे आले, असा थेट सवाल उपस्थित करत सुषमा अंधारे यांनी या संपूर्ण भरती प्रक्रियेच्या आणि निकालाच्या चौकशीची मागणी केली आहे. सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर आरोप केल्यानंतर आयोगानेही त्यावर तात्काळ स्पष्टीकरण दिलं आहे. माथाडी निरीक्षक भरती प्रक्रिया ही एमपीएससीकडून घेण्यात आली नाही, असं एका निवेदनाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलं आहे.

कामगार आयुक्तालया मार्फत माथाडी निरीक्षक पदाच्या ५९ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यासाठी ११ जूनला अर्ज भरून घेण्यात आले, तर २९ आणि ३० जुलै रोजी परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी तब्बल २३ हजार ५७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. एमपीएससी भरतीतील अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांनी एस. जोशी पुलावर सलग १२ दिवस तीव्र आंदोलन केले होते. एमपीएससी आणि शासकीय परीक्षांमध्ये सातत्याने होणाऱ्या अशा गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले असल्याचे अंधारे म्हणाल्या.