Parner Nagar Panchayat : पारनेर नगरपंचायतीचे ८५ स्ट्रीट लाईट पोल गायब; ठेकेदाराविरुद्ध पोलिसांत तक्रार

या प्रकारात अन्य व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही तपास करण्याची विनंती

0
Parner Nagar Panchayat : पारनेर नगरपंचायतीचे ८५ स्ट्रीट लाईट पोल गायब; ठेकेदाराविरुद्ध पोलिसांत तक्रार
Parner Nagar Panchayat : पारनेर नगरपंचायतीचे ८५ स्ट्रीट लाईट पोल गायब; ठेकेदाराविरुद्ध पोलिसांत तक्रार

Parner Nagar Panchayat : पारनेर : खडकी ते देवीभोयरे फाटा रस्त्याच्या कामादरम्यान पारनेर नगरपंचायतीच्या (Parner Nagar Panchayat) मालकीचे ८५ स्ट्रीट लाईट पोल व त्यावरील हायमॅक्स लाईट कोणतीही पूर्वपरवानगी न घेता काढून नेण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा डॉ. विद्या बाळासाहेब कावरे (Dr. Vidya Balasaheb Kavare) यांनी पारनेर पोलीस ठाण्याचे (Parner Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

नक्काी वाचा : पाथर्डीत बैल गाड्या,जनावरांसह शेतकरी रस्त्यावर; तुळजवाडी फाट्यावर रास्ता रोको

नगरपंचायतीला अधिकृत माहिती देणे अपेक्षित

 निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,खडकी ते देवीभोयरे फाटा रस्त्याचे काम सुरू असताना नगरपंचायतीच्या मालकीचे एकूण ८५ स्ट्रीट लाईट पोल आणि त्यावर बसविण्यात आलेले हायमॅक्स लाईट काढून नेण्यात आले आहेत. हे साहित्य काढण्यासाठी नगरपंचायतीची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सदर पोल आणि दिवे सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेली नगरपंचायतीची मालमत्ता आहे. हे साहित्य काढताना आवश्यक परवानगी घेणे, त्याची नोंद ठेवणे, सुरक्षित ठिकाणी जमा करणे आणि नगरपंचायतीला अधिकृत माहिती देणे अपेक्षित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मालमत्तेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित (Parner Nagar Panchayat)

मात्र, काढून नेण्यात आलेल्या साहित्याचा सध्याचा ठावठिकाणा नगरपंचायतीला उपलब्ध नसल्याने मालमत्तेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.या प्रकरणात संबंधित ठेकेदाराला पोल व दिवे काढण्याचे आदेश कोणी दिले, त्यासाठी कोणती परवानगी घेण्यात आली होती, तसेच हे साहित्य सध्या कुठे आणि कोणाच्या ताब्यात आहे, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकारात अन्य व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही तपास करण्याची विनंती करण्यात आली आहे.पोलिसांनी प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित ठेकेदारासह जबाबदार व्यक्तींची चौकशी करावी, सर्व ८५ पोल व हायमॅक्स दिव्यांचा शोध घ्यावा आणि कागदपत्रांची तपासणी करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. 

चौकशीत मालमत्तेचे नुकसान किंवा अपहार अथवा अन्य कोणताही गुन्हा निष्पन्न झाल्यास संबंधितांविरुद्ध लागू कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी नगराध्यक्षा डॉ. कावरे यांनी केली आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता आणि काढून नेलेल्या साहित्याची सद्यस्थिती पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.