Burhannagar Devi : बुऱ्हाणनगर देवी भवानी मंदिरात दुर्गाष्टमी होम; शुंभ-निशुंभ व महिषासुर वधाचा देखावा

दुष्काळ निवारण व पर्जन्यवृष्टीसाठी संकल्प; तुळजापूरच्या पायी पालखी यात्रेशी संबंधित झोपडी प्रज्वलनाची परंपरा जपली

0
Burhannagar Devi : बुऱ्हाणनगर देवी भवानी मंदिरात दुर्गाष्टमी होम; शुंभ-निशुंभ व महिषासुर वधाचा देखावा
Burhannagar Devi : बुऱ्हाणनगर देवी भवानी मंदिरात दुर्गाष्टमी होम; शुंभ-निशुंभ व महिषासुर वधाचा देखावा

Burhannagar Devi : नगर : श्री क्षेत्र बुऱ्हाणनगर येथील देवी (Burhannagar Devi) भवानी मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त पारंपरिक पद्धतीने दुर्गाष्टमी होम पार पडला. यानिमित्त शुंभ-निशुंभ व महिषासुर (Shumbha-Nishumbha and Mahishasura) यांच्या वधाचा पौराणिक प्रसंग प्रतीकात्मक स्वरूपात साकारण्यात आला. या कथानकाला अनुसरून श्री देवीची विशेष सजावट करून देखावाही उभारण्यात आला. दुर्गाष्टमीनिमित्त विधिवत होम-हवन करण्यात आले. दुष्काळाचे (Drought) संकट दूर व्हावे, समाधानकारक पर्जन्यवृष्टी व्हावी, शेतकरी सुखी व समृद्ध व्हावा तसेच रोगराई व नैसर्गिक संकटांचे निवारण व्हावे, या जनकल्याणाच्या संकल्पाने होमामध्ये आहुती अर्पण करण्यात आल्या. शुंभ-निशुंभ व महिषासुर यांच्या प्रतिकृती उभारून त्यांच्या वधाचा प्रसंग प्रतीकात्मक स्वरूपात सादर करण्यात आला. त्याच धर्तीवर श्री देवीची विशेष सजावट करण्यात आल्याने दुर्गाष्टमीशी संबंधित पौराणिक कथानक भाविकांसमोर देखाव्याच्या माध्यमातून मांडण्यात आले.

नक्की वाचा : अहिल्यानगरमध्ये शैक्षणिक सहलीसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी

Burhannagar Devi : बुऱ्हाणनगर देवी भवानी मंदिरात दुर्गाष्टमी होम; शुंभ-निशुंभ व महिषासुर वधाचा देखावा
Burhannagar Devi : बुऱ्हाणनगर देवी भवानी मंदिरात दुर्गाष्टमी होम; शुंभ-निशुंभ व महिषासुर वधाचा देखावा

झोपडी प्रज्वलनातून ऐतिहासिक परंपरेचे जतन

दुर्गाष्टमी होमावेळी झोपडी प्रज्वलित करण्याची जुनी परंपराही यंदा जपण्यात आली. भगत परिवाराच्या मौखिक परंपरेनुसार, या प्रथेचा संबंध बुऱ्हाणनगरहून तुळजापूरला नेण्यात येणाऱ्या श्री देवीच्या पायी पालखी यात्रेशी आहे. पूर्वी भगत परिवारातील पूर्वज श्री देवीची पालखी घेऊन बुऱ्हाणनगरहून पायी तुळजापूरला जात असत. त्या काळी या यात्रेस मोठा कालावधी लागत असे. प्रदीर्घ यात्रेदरम्यान घराची ओढ व आठवण मागे ठेवून देवीच्या सेवेत मन एकाग्र राहावे, या भावनेतून घराचे प्रतीक म्हणून झोपडी प्रज्वलित करण्याची प्रथा सुरू झाल्याचे भगत परिवाराकडून सांगण्यात येते. पुढील पिढ्यांनीही ही परंपरा कायम ठेवली असून दुर्गाष्टमी होमाच्या निमित्ताने आजही तिचे पालन केले जाते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

Burhannagar Devi : बुऱ्हाणनगर देवी भवानी मंदिरात दुर्गाष्टमी होम; शुंभ-निशुंभ व महिषासुर वधाचा देखावा
Burhannagar Devi : बुऱ्हाणनगर देवी भवानी मंदिरात दुर्गाष्टमी होम; शुंभ-निशुंभ व महिषासुर वधाचा देखावा

पर्जन्यवृष्टीसाठी संकल्प (Burhannagar Devi)

श्री बुऱ्हाणनगर देवी भवानी मंदिराचे प्रमुख तथा पुजारी अॅड. विजय भगत यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गाष्टमी होम व संबंधित धार्मिक विधी पार पडले. त्यांचे पुत्र अॅड. अभिषेक भगत व कविता भगत यांनी संकल्प सोडून होमाची पूर्णाहुती दिली. यावेळी दुर्गा भगत, सुभाष भगत, सुनंदा भगत, कुणाल भगत, अॅड. संकेत भगत, अक्षदा भगत, अजिंक्य भगत, वैभवी भगत, वेद, वेदिका यांच्यासह भगत परिवारातील सदस्य आणि देवीभक्त भाविक उपस्थित होते. दुर्गाष्टमी होम, दुष्काळ निवारण व पर्जन्यवृष्टीसाठी करण्यात आलेला संकल्प, शुंभ-निशुंभ व महिषासुर वधाचा प्रतीकात्मक देखावा, श्री देवीची विशेष सजावट आणि तुळजापूरच्या पायी पालखी यात्रेशी संबंधित झोपडी प्रज्वलनाची परंपरा ही यंदाच्या दुर्गाष्टमी सोहळ्याची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली.