नगर : आजच्या धकाधकीच्या आणि स्वार्थी जगात माणुसकी हरवत चालल्याची खंत व्यक्त होत असताना, संगमनेरमधून (Sangamner News) माणुसकीचे दर्शन घडवणारी एक घटना (An incident that showcases humanity) घडली आहे. बसस्थानक परिसरात सापडलेली रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे स्वतः त्या वृद्ध महिलेच्या घरी जाऊन परत करत एका नागरिकाने प्रामाणिकपणाचा एक आदर्श घालून दिला आहे. आता नेमकी ती व्यक्ती कोण आणि पैसे हरवले कोणाचे होते ते सविस्तर जाणून घेऊ…
नक्की वाचा : दुष्काळमुक्तीचा अण्णा हजारेंचा ‘राळेगण पॅटर्न’! विशेष निवारण आराखडा तयार
नेमकी घटना काय? (Sangamner News)
संगमनेर बसस्थानक परिसरात सापडलेली आठ ते नऊ हजार रुपयांची रोकड, त्यात आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक हे एका व्यक्तीने एका वृद्ध महिलेला घरी जाऊन परत केले. हरवलेले पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे पुन्हा मिळाल्याने संगमनेर तालुक्यातील मालदाड येथे राहणाऱ्या वयोवृद्ध अनुसया गोफणे यांचे डोळे पाणावले होते. भगवान शिंदे हे संगमनेर शहरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात नोकरी करतात. मंगळवारी (ता.२०) सायंकाळी ते चहा पिण्यासाठी बसस्थानक परिसरात गेले होते. त्यावेळी त्यांना तेथे एक प्लास्टिकची पिशवी आढळली. त्यांनी पिशवी तपासली असता, त्यामध्ये आधार कार्ड, बँकेचे पासबुक आणि रुमालात बांधून ठेवलेली आठ ते नऊ हजार रुपयांची रोकड आढळली.
अवश्य वाचा : भगवानगडाचे चौथे महंत कृष्णा महाराज शास्त्री नेमके कोण?
पिशवीतील कागदपत्रांवरून त्यांनी या वृद्ध महिलेचा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, चौकशी केल्यानंतर ही महिला मालदाड गावातील असल्याचे समजले. त्यानंतर शिंदे यांनी बुधवारी (ता. २१) या महिलेच्या घरी जाऊन तिची भेट घेतली. हरवलेली रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे त्यांना परत केली. हरवलेली रक्कम आणि कागदपत्रे पुन्हा हातात मिळाल्याने अनुसया गोफणे यांना मोठा दिलासा मिळाला.
वृद्ध माऊलीचे डोळे पाणावले (Sangamner News)
आजच्या काळात जिथे लहान-सहान गोष्टींवरून प्रामाणिकपणा पणाला लावला जातो, तिथे संगमनेरमधील या नागरिकाने दाखवलेली तत्परता आणि नैतिकता कौतुकास्पद ठरली आहे. हरवलेले पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे वेळेवर मिळाल्याने वृद्ध माऊलीच्या डोळ्यात आनंदाश्रू तर आलेच, शिवाय समाजमनात माणुसकी आणि प्रामाणिकपणाची ज्योत अजूनही पेटती आहे, हा विश्वास अधिक दृढ झाला.



