ADCC Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत 11 जागा बिनविरोध 10 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात

ADCC Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत 11 जागा बिनविरोध 10 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात

0
ADCC Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत 11 जागा बिनविरोध 10 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात
ADCC Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत 11 जागा बिनविरोध 10 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात

विखे-थोरात, लंके व प्रा. शिंदेंचे स्वतंत्र पॅनेल

ADCC Bank Election : नगर : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या (ADCC Bank Election) निवडणुकीत अखेर 11 उमेदवार बिनविरोध झाले. आता 10 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासाठी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. यासाठी विखे-थोरात, लंके व प्रा. शिंदेंचे स्वतंत्र पॅनेल, कपबशी-छत्री- शिट्टी असा सामना रंगणार आहे. सर्वाधिक चुरस महिला राखीव जागेसाठी (Women’s Reserved Seat) आहे. तेथे दोन जांगासाठी सात महिला रिंगणात असून त्यातील अनेक जणी जिल्हा परिषदेच्या राजकारणातील आहेत.

2 नोव्हेंबरला मतदान व 3 नोव्हेंबरला मतमोजणी

जिल्हा सहकारी बँकेसाठी 2 नोव्हेंबरला मतदान होणार आहे व त्याची मतमोजणी 3 नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे सहकार विकास पॅनेल असून, त्यांना कपबशी चिन्ह मिळाले आहे. खा. निलेश लंके व माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे सहकार परिवर्तन पॅनेल असून, त्यांना छत्री चिन्ह मिळाले आहे. तर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनीही तिसरे स्वतंत्र पॅनेल केले असून, त्याला शिट्टी चिन्ह मिळाले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

या जागांसाठी हाेणार लढती (ADCC Bank Election)

सोसायटी मतदार संघात 10 जागा बिनविरोध झाल्या व चार जागांवर लढती होत आहेत. बिगरशेती मतदार संघ जागा बिनविरोध झाली आहे. महिला राखीवच्या दोन तसेच, शेती पूरक संस्था, अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त व ओबीसी या मतदार संघात चुरस रंगणार आहे. दरम्यान, बिनविरोध झालेल्या 11 जणांपैकी थोरात गटाचे 6, विखे गटाचे 4 व प्रा. शिंदे यांच्या गटाचा 1 उमेदवार असल्याचे सांगितले जाते.

अकोले व कर्जत सोसायटी मतदार संघातील लढती रिंगणातील चारही उमेदवार स्वबळावर लढत आहेत.
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे सुमारे साडेतीन हजारावर सभासद प्रतिनिधी मतदार आहेत. बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागा आहेत.

बिनविरोध झालेले 11 संचालक

सोसायटी मतदार संघ ः जामखेड – सचिन घुमरे (प्रा. शिंदे गट), अहिल्यानगर तालुका – आ. अक्षय कर्डिले (विखे गट), कोपरगाव- बिपीन कोल्हे (थोरात गट), नेवासा- माजी मंत्री शंकरराव गडाख (थोरात गट), पाथर्डी- आ. मोनिकाताई राजळे (थोरात गट), राहाता – माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (विखे गट), संगमनेर – रणजितसिंह देशमुख (थोरात गट), शेवगाव- माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई घुले (थोरात गट), श्रीरामपूर- नगराध्यक्ष करण ससाणे (थोरात गट) व श्रीगोंदे- दत्ता पानसरे (विखे गट). बिगर शेती संस्था मतदार संघ ः सचिन जगताप (विखे गट)

यांच्यात होणार आता लढती

सोसायटी मतदार संघ : अकोले – आ. डॉ. किरण लहामटे व संजीवनी शिंदे, कर्जत – तुषार पिसाळ व ज्योती शिंदे, पारनेर- खा. निलेश लंके व राहुल शिंदे, राहुरी- आ. प्राजक्त तनपुरे व सत्यजित कदम. शेतीपूरक मतदार संघ – आ. आशुतोष काळे व सुधीर म्हस्के. महिला राखीव (दोन जागा) मतदार संघ- हर्षदा काकडे, पुष्पा गायकवाड, मंजुषा गुंड, अनुराधा नागवडे, सुवर्णा पाचपुते, संध्या महांडुळे व संगीता वाघ. अनुसूचित जाती-जमाती मतदार संघ- माजी आमदार वैभव पिचड व प्रशांत लोखंडे. इतर मागासर्व-ओबीसी मतदार संघ – शिवदास गुंजाळ, कारभारी जावळे, जालिंदर वाकचौरे, कडूचंद शेटे व आजिनाथ हजारे. भटके विमुक्त मतदार संघ- सुभाष गिते, ऋषिकेश ढाकणे व गणपतराव सांगळे.

शिंदेंसोबत जुळल्याचा विखे गटाचा दावा

दरम्यान, या घडामोडीत विखे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धपत्रकात सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासोबत समन्वय असल्याचा दावा करण्यात आला आहे. जामखेडमधून सचिन घुमरे यांची बिनविरोध निवड झाल्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सभापती प्रा. राम शिंदे यांच्या गटांमधील स्थानिक समन्वयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. जामखेडच्या राजकारणात दोन्ही नेत्यांचे स्वतंत्र प्रभावक्षेत्र आहे. अशा परिस्थितीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवड घडून येणे ही स्थानिक पातळीवरील जुळवाजुळव आणि सहमतीची महत्त्वपूर्ण बाब मानली जात आहे. सहकार संस्थांमधील प्रतिनिधित्व निश्चित करताना परस्पर समन्वयातून मार्ग काढता येतो, हे या घडामोडीतून अधोरेखित झाले आहे, असा दावा विखे यांच्याकडून करण्यात आला आहे.