Sky Lantern : न्यू इंग्लिश स्कूल वाकोडीच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम; टाकाऊ वस्तुंपासून बनवले पर्यावरण पूरक आकाशकंदील 

पर्यावरण पूरक आकाशकंदिल बनवा उपक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांचा आवडीने सहभाग

0
Sky Lantern : न्यू इंग्लिश स्कूल वाकोडीच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम; टाकाऊ वस्तुंपासून बनवले पर्यावरण पूरक आकाशकंदील 
Sky Lantern : न्यू इंग्लिश स्कूल वाकोडीच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम; टाकाऊ वस्तुंपासून बनवले पर्यावरण पूरक आकाशकंदील 

Sky Lantern : नगर : स्वच्छ भारत (Clean India), सुंदर भारत…प्लास्टिक मुक्त भारत या संकल्पनेतून न्यू इंग्लिश स्कूल , वाकोडी ता. नगर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जुन्या वह्यांचे पुठ्ठे, जुने कँलेंडर, जुन्या लग्न पत्रिका, खराट्याच्या काड्या, बांबूच्या काड्या, जुन्या साडीचे काठ, चहाचे पेपर ग्लास या टाकाऊ वस्तुंपासून तसेच घोटिव कागद नैसर्गिक रंगाचा (Natural colors) उपयोग करून पर्यावरण पूरक आकाशकंदील (Sky Lantern) बनवले आहे.

नक्की वाचा : भाजपमधील अंतर्गत संघर्षाने निवडणुकीचे गणित बदलले; जिल्हा बँकेच्या १० जागांसाठी २७ उमेदवार; लंके यांच्या राजकीय भूमिकेची कसोटी

Sky Lantern : न्यू इंग्लिश स्कूल वाकोडीच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम;  टाकाऊ वस्तुंपासून बनवले पर्यावरण पूरक आकाशकंदील 
Sky Lantern : न्यू इंग्लिश स्कूल वाकोडीच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम; टाकाऊ वस्तुंपासून बनवले पर्यावरण पूरक आकाशकंदील 

विद्यार्थ्यांचा आवडीने सहभाग

यामध्ये पर्यारणाला कुठेही हानी पोहचाल असे प्लास्टिक व थर्माकाॅलचा वापर करण्यात आला नसल्याचे सांगितले. या पर्यावरण पूरक आकाशकंदिल बनवा उपक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आवडीने सहभाग घेतला. या उपक्रमाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला शरदराव तोडमल, संस्थेचे सचिव आबासाहेब तोडमल व मुख्याध्यापक कराळे विजय यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

Sky Lantern : न्यू इंग्लिश स्कूल वाकोडीच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम;  टाकाऊ वस्तुंपासून बनवले पर्यावरण पूरक आकाशकंदील 
Sky Lantern : न्यू इंग्लिश स्कूल वाकोडीच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम; टाकाऊ वस्तुंपासून बनवले पर्यावरण पूरक आकाशकंदील 

शिक्षकांचे सहकार्य (Sky Lantern)

तसेच हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील घालमे सर, गायकवाड उमेश, बाबळे एकनाथ,  मोढवे राणी, अविनाश येरकल, प्रफुल्ल सुर्यवंशी, हराळे योगेश या शिक्षकांनी सहकार्य केले.