Dattatray Pansare : सहकारात डॉ. विखे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार : पानसरे

सर्वपक्षीय नेत्यांच्या सहकार्याने श्रीगोंद्यातून मिळाली संधी

0
Dattatray Pansare : सहकारात डॉ. विखे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार : पानसरे
Dattatray Pansare : सहकारात डॉ. विखे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार : पानसरे

Dattatray Pansare : नगर : जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणात यापुढे डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याची घोषणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (District Central Cooperative Bank) श्रीगोंदा सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध निवड झालेले उमेदवार दत्तात्रय पानसरे (Dattatreya Pansare) यांनी केली आहे. गुरुवार जिल्हा बँक चिन्ह वाटप प्रक्रियेनंतर ते नगरमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार विक्रम पाचपुते आणि माजी आमदार राहुल जगताप उपस्थित होते.

नक्की वाचा : न्यू इंग्लिश स्कूल वाकोडीच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम; टाकाऊ वस्तुंपासून बनवले पर्यावरण पूरक आकाशकंदील

मुंबईतून मुख्यमंत्र्यांचा संदेश

मी काल दुपारपर्यंत निवडणुकीच्या तयारीत होतो; परंतु मुंबईतून मुख्यमंत्र्यांचा संदेश आल्यानंतर माझी उमेदवारी अंतिम झाली, असे सांगत पानसरे पुढे म्हणाले की, आ. विक्रम पाचपुते यांनी संयम राखत आणि मनाचा मोठेपणा दाखवत श्रीगोंद्यातून मला जिल्हा बँकेत काम करण्याची संधी दिली. तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून मला बिनविरोध पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी त्यांनी, आमदार संग्राम जगताप हे पाहुणेच असून, ते पाहुणे असण्याचा फायदा आणि तोटा असे दोन्ही होत असल्याचे, मिश्कीलपणे नमूद केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

ही कामगिरी ऐतिहासिक व महाराष्ट्राला दिशादर्शक (Dattatray Pansare)

यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीच्या वेळी झालेल्या चर्चांनुसारच हा निर्णय झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी जागा बिनविरोध झाल्या असून, यावरून शेतकरी सभासदांचा कल स्पष्ट होतो. सुरूवातीपासून जिल्हा बँक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न झाले आणि 11 जागा बिनविरोध झाल्या; ही कामगिरी ऐतिहासिक व महाराष्ट्राला दिशादर्शक आहे. आ. विक्रम पाचपुते यांनी बंधू प्रताप पाचपुते यांच्याऐवजी पानरे यांना संधी देऊन मोठा राजकीय संदेश दिला असल्याचे मत आमदार जगताप यांनी व्यक्त केले.

आमदार विक्रमसिंह पाचपुते म्हणाले की, श्रीगोंदा सोसायटी मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी आ. राहुल जगताप आणि राजेंद्र नागवडे यांचे मोठे योगदान आहे. श्रीगोंद्यातील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र बसलो आणि एक अनपेक्षित परंतु नगर जिल्ह्याला नवी वाट दाखवणारा निर्णय घेतला, असा विश्‍वास पाचपुते यांनी व्यक्त केला.