Bhanudas Kotkar : ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचे निधन

Bhanudas Kotkar : ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचे निधन

0
Bhanudas Kotkar : ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचे निधन
Bhanudas Kotkar : ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचे निधन

Bhanudas Kotkar : अहिल्यानगर : अहिल्यानगरमधील ज्येष्ठ नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Ahilyanagar Agricultural Produce Market Committee) माजी सभापती भानुदास एकनाथ कोतकर (Bhanudas Kotkar) (वय ७४) यांचे आज, शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी निधन झाले. त्यांना अचानक हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला, त्यानंतर त्यांना उपचारासाठी अहिल्यानगरमधील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तिथे त्यांची प्राणज्योत मालवली.

राजकीय कारकिर्दीत महत्त्वाच्या पदांवर काम

भानुदास कोतकर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील केडगाव परिसरात गेल्या 30 वर्षांपासून प्रभावी नेते मानले जात होते. ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राहिले आहेत. भानुदास कोतकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले.

नगर पंचायत समितीचे सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आणि जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. राजकारणासोबतच उद्योग क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले. ते संदीप उद्योग समूहाचे संस्थापक होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

तीन दशके केडगाव परिसरावर निर्विवाद वर्चस्व (Bhanudas Kotkar)

भानुदास एकनाथ कोतकर यांचे जीवन आणि त्यांची राजकीय कारकीर्द म्हणजे सत्ता, अफाट व्यावसायिक यश आणि तितकाच गडद गुन्हेगारी इतिहास यांचा एक गुंतागुंतीचा पट होता. स्थानिक पातळीवर एका सामान्य कार्यकर्त्यापासून सुरुवात करून अहिल्यानगरच्या राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करणे आणि पुढील तीन दशके केडगाव परिसरावर निर्विवाद वर्चस्व गाजवणे, ही त्यांची राजकीय ताकद दाखवून देणारी बाब होती. किंगमेकरच्या भूमिकेतून त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणाची अनेक समीकरणे बदलली आणि कौटुंबिक जोडण्यांच्या माध्यमातून सत्तेची गणिते आपल्याच भोवती केंद्रित ठेवली.


परंतु, त्यांच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले. व्यावसायिक स्पर्धेतून आणि राजकीय वैमनस्यातून घडलेली अशोक लांडे हत्येसारखी खळबळजनक प्रकरणे कोतकरांच्या साम्राज्याला सुरुंग लावणारी ठरली. अखेरच्या टप्प्यात मिळालेली जन्मठेपेची शिक्षा, जिल्हाबंदीची नामुष्की आणि आरोग्याच्या सातत्याच्या तक्रारींमुळे त्यांचे वैभवशाली आणि धाकयुक्त आयुष्य न्यायालयीन लढाईच्या चौकटीत अडकून पडले. निधनाच्या अवघ्या काही दिवस आधी पडलेले आयकर विभागाचे छापे हे त्यांच्या व्यावसायिक साम्राज्याला लागलेले शेवटचे ग्रहण ठरले.