Suicide : 35 वर्षीय महिलेवर गोळीबार; घटनास्थळावरून पसार झालेल्या तरूणाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

कापूरवाडी परिसरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर

0
Suicide : 35 वर्षीय महिलेवर गोळीबार; घटनास्थळावरून पसार झालेल्या तरूणाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या
Suicide : 35 वर्षीय महिलेवर गोळीबार; घटनास्थळावरून पसार झालेल्या तरूणाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

Suicide : नगर : शहरातील सावेडी उपनगरातील भगवान बाबा चौक परिसरात एका 35 वर्षीय महिलेवर तरूणाने गोळीबार (Firing) केल्याची घटना शुक्रवारी (ता.23) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. या घटनेत महिला जखमी (Injured) झाली असून, गोळीबारानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या तरूणाने कापूरवाडी परिसरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केली. योगेश सोमनाथ डोंगरे असे मृत तरूणाचे नाव असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

नक्की वाचा : डॉ. अभय फिरोदिया यांना प्रतिष्ठित ‘आयओजे अहिंसा पुरस्कार’; लंडनच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये वितरण

संबंधित महिला आणि तरूण एकमेकांच्या परिचयाचे

भगवान बाबा चौक परिसरातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही घटना घडली. संबंधित महिला आणि तरूण एकमेकांच्या परिचयाचे होते. दोघे फ्लॅटमध्ये असताना त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. या वादातून तरूणाने महिलेवर बंदुकीतून गोळी झाडली. गोळीबारात महिला जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष मुटकुळे, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक बालाजी वैद्य यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिलेला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. टिपरसे यांनी दिली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

तरूण घटनास्थळावरून पसार (Suicide)

दरम्यान, गोळीबार केल्यानंतर तरूण घटनास्थळावरून पसार झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, काही वेळानंतर कापूरवाडी परिसरात त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले. या घटनेची माहिती कळतात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. महिला आणि तरूण यांच्यात नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.