Nagastra-2 | नगर : जगभरात आखाती युद्धाने आत्मघाती ड्रोनचे महत्त्व सांगितले आहे. हे पाहता भारतीय सैन्याला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय सैन्याची युद्धभूमीवरील ताकद वाढविण्यासाठी सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडने विकसित केलेले अँडव्हान्स नागास्त्र-२ ( Nagastra-2 ) हे आत्मघाती ड्रोन सैन्याकडे यशस्वीरीत्या सुपूर्द केले आहे.
नक्की वाचा : ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर अनंतात विलीन; केडगाव येथे राहत्या घराजवळ झाला अंत्यविधी
पल्ला २५ किलोमीटरपेक्षा जास्त ( Nagastra-2 )
राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे ऑगस्ट २०२६मध्ये नागास्त्र-२च्या अंतिम तांत्रिक चाचण्या घेण्यात आल्या. भारतीय सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या चाचण्यांमध्ये प्रणालीने सर्व निकष व मानके यशस्वीरीत्या पूर्ण केली. या नागास्त्र-२चा मारक पल्ला २५ किलोमीटरपेक्षा जास्त आहे. यात दिवस आणि रात्री अशा दोन्ही वेळेस काम करणारे इलेक्ट्रो-ऑप्टिकल सेन्सर्स आहेत. त्यामुळे शत्रूचे रणगाडे व सैन्याची हालचाल शोधून तात्काळ वेध घेता येतो.

इलेक्ट्रॉनिक युद्धाच्या काळात शत्रूचे जॅमिंग आणि स्पूफिंगचे प्रयत्न अपयशी ठरवण्यासाठी यात प्रगत ईसीसीएम तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. आधुनिक युद्धाच्या बदलत्या स्वरूपात शत्रूचे रणगाडे आणि चिलखती वाहने नष्ट करण्यासाठी स्वदेशी नागास्त्र-२ भारतीय सैन्यासाठी प्रभावी शस्त्र ठरणार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
‘नागास्त्र-२’ची प्रमुख वैशिष्ट्ये ( Nagastra-2 )
आत्मघाती ड्रोन
४ किलो वजनाचे टँडम शेप्ड-चार्ज वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता
६५० मिमी पर्यंतच्या आरएचए थराला भेदण्यासाठी डिझाइन केलेले
रियूज मोडमध्ये २५ किमी पल्ला
फायर-अँड-फॉरगेट मोडमध्ये ५० किमी पल्ला
६० मीटर पर्यंत टिकाऊपणा
ईसीसीएम क्षमता



