Water supply disrupted | नगर : अहिल्यानगर शहराला पाणी पुरवठा करणारी अहिल्यानगर महापालिकेची मुख्य जलवाहिनी देहरे शिवारात आज (ता. २५) पहाटे फुटली. त्यामुळे अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागाला उशिराने व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा दोन दिवसांसाठी विस्कळीत ( Water supply disrupted ) होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
नक्की वाचा : ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर अनंतात विलीन; केडगाव येथे राहत्या घराजवळ झाला अंत्यविधी
जलवाहिनी फुटली ( Water supply disrupted )
दोन दिवसांपूर्वी नांदगाव येथे जलवाहिनी फुटली होती. या जलवाहिनी दुरुस्तीचे काम काल पूर्ण करून शहराचा विस्कळीत झालेला पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असतानाच आज (ता. २५) पहाटे चार वाजेच्या सुमारास शहर पाणी पुरवठा योजनेची ११०० एम.एम व्यासाची मुख्य जलवाहिनी देहरे शिवारात स्विटी राज नर्सरी समोर पाण्याच्या व हवेच्या दाबाने फुटलेली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पाणी पुरवठ्यावर परिणाम ( Water supply disrupted )
तेथे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याने जलवाहिनीद्वारे मुळानगर येथून होणारा पाणी उपसा त्वरित बंद करण्यात आली. त्यानंतर तातडीने जलवाहिनी दुरूस्तीचे काम महापालिकेने हाती घेतले. मात्र, पाणी वाटपाच्या वेळेतच जलवाहिनी फुटल्याने आज (ता. २५) रोटेशननुसार पाणी वाटयाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाला उशीराने व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. दोन दिवसा पूर्वी मुख जलवाहिनी फुटल्याने सावेडी उपनगरातील पाणी पुरवठा बंद असलेल्या नागरी भागाला आज (ता. २५) पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
जलवाहिनी दुरूस्ती कामामुळे शहरासाठी पाणी कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने आज पाणी वाटप असलेल्या स्टेशन रोड परिसर, आगरकर मळा परिसर, विनायक नगर परिसर या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या भागाला सोमवारी (ता. २६) पाणी पुरवठा करण्यात येईल.
तर सोमवारी (ता. २६) बुरुडगाव रोड, सारस नगर, माणिक नगर, टिळक रोड, भोसले आखाडा या ठिकाणी होणारा पाणी पुरवठा हा मंगळवारी (ता. २७) करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेला सहकार्य करावे, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.



