Sanjeevani Group of Institute : संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाला एनबीए मानांकन; गुणवत्तेवर राष्ट्रीय समितीची मोहर कायम

संपूर्ण देशात आणि राज्यात ‘आउटकम बेस्ड एज्युकेशन’च्या कडक मानकांनुसार तपासणी

0
Sanjeevani Group of Institute : संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाला एनबीए मानांकन; गुणवत्तेवर राष्ट्रीय समितीची मोहर कायम
Sanjeevani Group of Institute : संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाला एनबीए मानांकन; गुणवत्तेवर राष्ट्रीय समितीची मोहर कायम

Sanjeevani Group of Institute : कोपरगाव : संजीवनी गुप ऑफ इन्स्टिट्यूट्स (Sanjeevani Group of Institute) संचलित, संजीवनी फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (बी. फार्मसी) या संस्थेला भारत सरकारच्या व्यावसायिक शिक्षण संस्थांची गुणवत्ता तपासणाऱ्या नवी दिल्ली येथील ‘नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रिडिटेशन (National Board of Accreditation) या सर्वोच्च स्वायत्त संस्थेने पुढील साडे तीन वर्षांसाठी प्रतिष्ठित ‘एनबीए’ मानांकन बहाल केले आहे. यामुळे पुन्हा एकदा संजीवनीच्या उच्च शैक्षणिक गुणवत्तेची राष्ट्रीय स्तरावर मोहर उमटली असून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशी अधिकृत माहिती संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे (Amit Kolhe) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

नक्की वाचा : दुष्काळाचे गांभीर्य विसरले; उत्सवात लाखोंची उधळपट्टी, कोपरगावकरांमध्ये चर्चेला उधाण

चढत्या आलेखाचा अहवाल

प्रेसिडेन्ट अमित कोल्हे यांनी पत्रकात पुढे नमूद केले की, ‘एनबीए’ मानांकनासाठी संस्थेने मागील तीन वर्षांतील विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या, उच्चविद्याविभूषित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, आदर्श विद्यार्थी-शिक्षक प्रमाण, प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे वाढते प्रमाण, उच्च शिक्षणासाठी परदेशात व नामांकित संस्थांमध्ये जाणारे विद्यार्थी आणि संस्थेच्या सक्रिय ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये मिळणाऱ्या चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्यांचे प्रमाण या सर्व आकडेवारीचा चढत्या आलेखाचा अहवाल सादर केला होता.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जागतिक दर्जाच्या कंपन्यांशी सामंजस्य करार (Sanjeevani Group of Institute)

यासोबतच प्राध्यापकांनी आधुनिक ज्ञानवृद्धीसाठी पूर्ण केलेले राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिसंवाद, सादर केलेले शोधनिबंध, कार्यशाळांची संख्या, कन्सल्टन्सी, विद्यार्थ्यांनी क्रीडा व इतर क्षेत्रांत मिळवलेले प्राविण्य, अत्याधुनिक प्रयोगशाळा, जागतिक दर्जाच्या कंपन्यांशी केलेले सामंजस्य करार, माजी विद्यार्थ्यांचे विविध कंपन्यांमधील उच्च पदे व त्या कंपन्यांचा या विद्यार्थ्यांबद्दलचा सकारात्मक अभिप्राय आणि पालकांचा संस्थेवरील ठाम विश्वास,भारत सरकारच्या विविध संस्थांकडून संशोधन कार्यासाठी मिळालेला रू १. ४८ कोटीचे अर्थसहाय्य, संस्थेच्या स्टाफने मिळविलेले ४३ पेटेंट, आटोनाॅमस दर्जा, नॅक ग्रेड, भारत सरकारच्या विविध संस्थांकडून मिळालेले पुरस्कार, या सर्व बाबींचा पुराव्यासहित अहवाल ‘एनबीए’ कार्यालयाला सादर करण्यात आला होता. एनबीएच्या कडक कार्यपद्धतीनुसार, राष्ट्रीय समितीने संस्थेने सादर केलेल्या सर्व पुराव्यांची आणि निकषांची प्रत्यक्ष पडताळणी केली होती. या भेटीनंतर अवघ्या एका महिन्यातच संस्थेला पुढील साडेतीन वर्षांसाठी अधिकृत मानांकन पत्र बहाल करण्यात आले.

शैक्षणिक क्षेत्रातील मोठी उपलब्धी

ही राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील खूप मोठी उपलब्धी मानली जात आहे. सध्या संपूर्ण देशात आणि राज्यात ‘आउटकम बेस्ड एज्युकेशन’च्या कडक मानकांनुसार तपासणी केली जाते. ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, केवळ आत्मविश्वासाच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर सलग २०१३ पासुन संजीवनी हे धाडसी पाऊल उचलत आहे. संजीवनी बी. फार्मसीच्या या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व यशाबद्दल संजीवनीचे अध्यक्ष श्री. नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे, संजीवनीच्या संचालिका डाॅ. मनालीताई कोल्हे यांनी संस्थेचे हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डाॅ. आर. एस. शेंडगे , हेड ऑफ इन्स्टिट्युट सर्विसेस श्री प्रकाश जाधव, डायरेक्टर डॉ. विपुल पटेल, डाॅ. आर. सी. सुतार. यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. या यशामुळे संपूर्ण कोपरगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून संजीवनी परिवारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

फोटो ओळीः संजीवनी बी.फार्मसी महाविद्यालयाला एनबीए मानांकन मिळाल्याबध्दल संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट श्री अमित कोल्हे व संचालिका डाॅ. मनाली कोल्हे यांनी डाॅ. पटेल व डाॅ. सुतार यांचा सत्कार केला. यावेळी डाॅ. शेंडगे उपस्थित होते.