Mula Project Canal : नगर : मुळा प्रकल्पाच्या (Mula Project Canal) उपलब्ध जलसाठ्याचा (Water Storage) काटकसरीने आणि कार्यक्षम वापर करण्यासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे सूक्ष्म नियोजन करावे. पाणी उपलब्ध करून देताना पाणीवापराचे योग्य नियोजन, वितरणातील कार्यक्षमता आणि पाण्याची बचत यांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पलकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Dr. Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिले.
नक्की वाचा : संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाला एनबीए मानांकन; गुणवत्तेवर राष्ट्रीय समितीची मोहर कायम

संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित
मुळा प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत प्रकल्पाच्या पाणीवापराचे नियोजन आणि कालव्यांद्वारे पाणी वितरणासंदर्भातील विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, विठ्ठल लंघे, हेमंत ओगले, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, उपमहापौर धनंजय जाधव, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

योग्य विनियोग होणे आवश्यक (Mula Project Canal)
पाण्याचे महत्त्व लक्षात घेता उपलब्ध जलसाठ्याचा योग्य विनियोग होणे आवश्यक आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. पाणी वितरण प्रक्रियेत समन्वय राखून उपलब्ध पाण्याचा योग्य उपयोग होईल, याची दक्षता घ्यावी, असेही मंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी मुळा प्रकल्प सिंचन क्षेत्र, लाभक्षेत्रातील पर्जन्यमान, सन 2026-27 खरीप हंगाम पाणी वापर तसेच पाण्याचे नियोजन याविषयी सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली.
सन 2026-27 रब्बी हंगामासाठी शिल्लक पाण्याचे नियोजन-
मुळा उजवा कालवा बंधाऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी-जानेवारी 2027 ते मार्च 2027 – आवर्तन 1 वेळा
मुळा डावा कालवा- जानेवारी 2027 ते मार्च 2027- आवर्तन 2 वेळा



