Deforestation : कर्जत : भीमाशंकर (Bhimashankar) (कर्जत जिल्हा रायगड) येथील एका प्रकल्पाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड (Deforestation) झाली असून या घटनेचा कर्जतच्या सर्व सामाजिक संघटनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी पर्यावरण श्रमप्रेमींनी (Environment-Conscious Laborers) तहसीलदार कर्जत यांना निवेदन देत निसर्ग ऱ्हासाचा संताप व्यक्त करीत शासन दरबारी आपल्या भावना मांडल्या. विकासाच्या नावाखाली होत असलेली निसर्गाची अपरिमित हानी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा या श्रमप्रेमींनी निवेदनाद्वारे दिला.
नक्की वाचा : मुळा प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक; पाण्याच्या बचतीला सर्वोच्च प्राधान्य
विरोधाभास निर्माण करीत असल्याची भावना
कर्जत (जि. रायगड) आणि भीमाशंकर परिसरात टोरेंटो कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी जंगल परिसरात अनेक वर्षांपासून निसर्ग जतन असलेले वृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोड सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या वृक्षतोडीमुळे परिसरातील नैसर्गिक वनसंपदा, जैवविविधता, वन्यजीवांचे अधिवास तसेच पर्यावरणीय संतुलन धोक्यात येण्याची गंभीर शक्यता आहे. वास्तविक पाहता आम्ही पर्यावरण प्रेमी विकासाला विरोध करीत नाही. मात्र विकासाच्या नावाखाली निसर्गाची अपरिमित हानी होणे योग्य नाही. आणि ती खपवून देखील घेतली जाणार नाही. एकीकडे शासन वृक्ष लागवड करण्यासाठी जागृती करीत असताना दुसरीकडे अनेक वर्षांपासूनची निसर्ग संपत्तीचा ऱ्हास करीत विरोधाभास निर्माण करीत असल्याची भावना होत आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
जंगल हे संपूर्ण परिसंस्थेचा आधार (Deforestation)
विकास आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. जंगल ही केवळ झाडांची संख्या नसून असंख्य पशू-पक्षी, वनस्पती, औषधी वनस्पती आणि संपूर्ण परिसंस्थेचा आधार आहे. तसेच एकदा नष्ट झालेली नैसर्गिक वनसंपदा पूर्ववत होण्यासाठी अनेक दशके लागू शकतात. त्यामुळे भीमाशंकर जंगल परिसरातील टोरेंटो कंपनीच्या प्रकल्पासाठी सुरू असलेली कथित मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड तात्काळ थांबवून वनसंपदा व जैवविविधतेचे संरक्षण करावे अशी मागणी कर्जतच्या सर्व सामाजिक संघटनेच्या श्रमप्रेमींनी शासन दरबारी केली आहे. या आशयाचे निवेदन कर्जतचे तहसीलदार रवी सतवन यांना सोमवारी देण्यात आले.



