Burglary case solved : अहिल्यानगरमध्ये घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेकडून मध्यप्रदेशातील दोघांसह चौघे ताब्यात

Burglary case solved : अहिल्यानगरमध्ये घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेकडून मध्यप्रदेशातील दोघांसह चौघे ताब्यात

0
Burglary case solved : अहिल्यानगरमध्ये घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेकडून मध्यप्रदेशातील दोघांसह चौघे ताब्यात
Burglary case solved : अहिल्यानगरमध्ये घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेकडून मध्यप्रदेशातील दोघांसह चौघे ताब्यात

Burglary case solved : नगर : शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या (Kotwali Police Station) हद्दीत झालेल्या घरफोडीचा (Burglary case solved) गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) उघडकीस आणला आहे. या प्रकरणात मध्यप्रदेशातील दोघांसह चोरीचा मुद्देमाल खरेदी केल्याच्या संशयावरून छत्रपती संभाजीनगर येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याची अंगठी, चांदीचे बिस्कीट, मोबाईल, लोखंडी पान्हा आणि बॅग असा एकूण १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यांना घेण्यात आले ताब्यात

कपील चावडा (वय २३, रा. पटवारी कॉलनी, बडवा, ता. महेश्वर, जि. खरगोण, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान कपील याने राजा चेयनसिंग पटेल (वय २३, रा. जयमलपूरा, बडवा, ता. महेश्वर, जि. खरगोण, मध्यप्रदेश),अनिल रामनारायण तिवारी (वय ५६, रा. खाराकुवा, भगवान प्लाझा, गुजराती हायस्कूलजवळ) आणि भारत नानासाहेब जोशी (वय ३२, रा. हरिओमनगर, जेठवाडा रोड, हर्सूल तलाव) यांना ताब्यात घेण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,(Burglary case solved)

१३ ऑक्टोबर २०२६ रोजी विवेक मारोतराव साखरे (वय ६४, रा. मातोश्री अपार्टमेंट, शिवनेरी चौक, अहिल्यानगर) यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू असताना, हा गुन्हा मध्यप्रदेशातील कपील चंपालाल चावडा याने साथीदाराच्या मदतीने केल्याची माहिती पथकाला मिळाली. तो नेवासा फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे सापळा रचून कपील चावडा (वय २३, रा. पटवारी कॉलनी, बडवा, ता. महेश्वर, जि. खरगोण, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान कपील याने राजा चेयनसिंग पटेल (वय २३, रा. जयमलपूरा, बडवा, ता. महेश्वर, जि. खरगोण, मध्यप्रदेश) याच्यासोबत घरफोडी केल्याची माहिती दिली. चोरीच्या मुद्देमालापैकी काही दागिने राजाकडे असल्याचे, तर उर्वरित मुद्देमाल छत्रपती संभाजीनगर येथे विकल्याचे त्याने सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी राजा पटेल यालाही ताब्यात घेतले.

पोलिसांनी पंचांसमक्ष केलेल्या कारवाईत ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ५० ग्रॅम वजनाचे चांदीचे बिस्कीट, एक मोबाईल, लोखंडी पान्हा आणि एक बॅग असा एकूण १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय चोरीचा मुद्देमाल घेतल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील अनिल रामनारायण तिवारी (वय ५६, रा. खाराकुवा, भगवान प्लाझा, गुजराती हायस्कूलजवळ) आणि भारत नानासाहेब जोशी (वय ३२, रा. हरिओमनगर, जेठवाडा रोड, हर्सूल तलाव) यांनाही ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या चौघांना जप्त मुद्देमालासह कोतवाली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, या गुन्ह्याचा पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.


ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये आणि पोलीस अंमलदार अरविंद भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे, शाहीद शेख, संदीप पवार, फुरकान शेख, मनोज साखरे, अमोल कोतकर व महादेव भांड यांच्या पथकाने केली.