Illegal transportation of water : नगर : बेकायदेशीररित्या पाण्याची वाहतूक (Illegal transportation of water) करणाऱ्या बारा टँकर मालकांना प्रादेशिक परिवहन विभागाने (Regional Transport Department) गुरुवारी जिल्हाभर विशेष मोहीम राबवित तब्बल एक लाखांचा दंड ठोठावला. त्यामुळे मुदत संपलेल्या वाहनांवर टाकी ठेवून पाण्याची वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार तपासणीतून समोर आला आहे.
पाण्याच्या टँकरची तपासणी करण्याचे आदेश
गुरुवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी पाण्याच्या टँकरची तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वाहतूक निरीक्षकांनी शहरासह जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेतली. पथकाने पाण्याचे स्रोत असलेल्या प्रेमदान चौक व महापालिकेच्या वसंत टेकडी येथे भेट देऊन टँकरच्या कागदपत्रांची तपासणी केली. बहुतांश टँकर चालकांकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती. जुन्या वाहनांना दरवर्षी वाहनाची तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. परंतु, नियम धाब्यावर बसवून जुने ट्रॅक्टर, ट्रक आणि टेम्पोंवर लोखंडी टाकी ठेवून पाण्याची सर्रास वाहतूक केली जाते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अवजड टँकरमुळे अपघाताची शक्यता (Illegal transportation of water)
क्षमतेपेक्षा अधिक पाण्याची वाहतूक टँकरमधून केली जाते. अवजड वाहने शहरातील रस्त्यावर धावतात. टँकरवर साधी नंबर प्लेट देखील नसते. पाठीमागून साईड लॅम्पही नसतात. हे टँकर एवढे अवजड असतात की चौकात त्यांना वळणही घेता येत नाही. अवजड टँकरमुळे अपघात होतात. त्यात निष्पाप लोकांचे बळी जातात.



