State Excise Department : अहिल्यानगरमध्ये मद्य तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा छापा!; कंटेनरमधून १ कोटी ७२ लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त

State Excise Department : अहिल्यानगरमध्ये मद्य तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा छापा!; कंटेनरमधून १ कोटी ७२ लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त

0

State Excise Department : नगर : महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला आणि मध्य प्रदेशात विक्रीसाठी उपलब्ध असलेला विदेशी मद्यसाठा कंटेनरमधून वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) पथकाने मोठी कारवाई केली. नगर-मनमाड महामार्गावरील नांदगाव शिवारात एका हॉटेल समोर सापळा रचून दहा चाकी कंटेनरमधून तब्बल १ कोटी ७२ लाख ४२ हजार ९६० रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त (Stock of foreign liquor seized) करण्यात आला. या प्रकरणी कंटेनर चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर-मनमाड महामार्गावर सापळा रचून कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सूरज कुसळे यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक, भरारी पथक अहिल्यानगर-१ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ‘ब’ विभागातील पथकाने नांदगाव परिसरात नगर-मनमाड महामार्गावर सापळा रचला. यावेळी संशयित दहा चाकी कंटेनर अडवून दोन पंचांसमक्ष त्याची तपासणी करण्यात आली. कंटेनरची झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

१२५० बॉक्स मद्यसाठ्यासह कंटेनर जप्त (State Excise Department)

जप्त करण्यात आलेल्या मद्यसाठ्यामध्ये एकूण १हजार २५० बॉक्समधील मद्यसाठ्यासह कंटेनर जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ कोटी ७२ लाख ४२ हजार ९६० रुपये असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी कंटेनर चालक मुस्तकीम मुंशी खान (रा. वॉर्ड क्रमांक ४, धारड, ता. व जि. रतलाम, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे आणि पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. अधीक्षक नितीन घुले आणि उपअधीक्षक प्रवीणकुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक सूरज कुसळे व ‘ब’ विभागाचे निरीक्षक बाबुराव घुगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.