उपाध्यक्षपदी स्वप्निल झोडगे, सचिव पदी प्रसाद शिंदे तर खजिनदार पदावर वैष्णवी कदम यांनी निवड
Bhingar Press Club : अहिल्यानगर : येथील स्थानिक पत्रकारांची (Journalist) नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत ‘भिंगार प्रेस क्लब’ची (Bhingar Press Club) एकमताने स्थापन करण्यात आली. या बैठकीत अध्यक्ष बाबासाहेब ढाकणे, उपाध्यक्ष स्वप्निल झोडगे, सचिव प्रसाद शिंदे, सहसचिव अमोल भिंगारदिवे, खजिनदार वैष्णवी कदम आदींची एकमताने नवनियुक्त पदाधिकार्यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी स्वप्निल झोडगे
अध्यक्षपदासाठी उमेर सय्यद यांनी बाबासाहेब ढाकणे यांच्या नाव सुचविले. त्यास अनिकेत यादव यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी मोहसीन कुरेशी यांनी स्वप्निल झोडगे यांचे नाव सूचविले, त्यास गिरीष रासकर यांनी अनुमोदन दिले. सचिवपदासाठी प्रशांत पाटोळे यांनी प्रसाद शिंदे यांचे नाव सुचविले, त्यास स्वप्निल झोडगे यांनी अनुमोदन दिले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
खजिनदारपदी वैष्णवी कदम (Bhingar Press Club)
सहसचिवपदासाठी बाबासाहेब ढाकणे यांनी अमोल भिंगारदिवे यांचे नाव सुचविले, त्यास अनिकेत यादव यांनी अनुमोदन दिले, तर खजिनदारपदासाठी स्वप्निल झोडगे यांनी वैष्णवी कदम यांचे नाव सूचविले, त्यास गिरीष रासकर यांनी अनुमोदन दिले. यावेळी बैठकीत भिंगार प्रेस क्लब नवनियुक्त पदाधिकार्यांचा व उपस्थितीत कार्यकारिणी सदस्यांचा शाल, पुष्प देऊन गौरव करण्यात आला.



