
Sanjeevani Sainiki School : कोपरगाव : राष्ट्रीय एकता दिनानिमित्त (National Unity Day) ३१ ऑक्टोबर रोजी गुजरातमधील एकतानगर येथे होणाऱ्या ‘एकता परेड-२०२६’ मध्ये संजीवनी सैनिकी स्कूल (Sanjeevani Sainiki School) अँड ज्युनिअर कॉलेजचे ब्रास बँड पथक आपल्या सुरेल व शिस्तबद्ध वादनाने राष्ट्रीय मंचावर महाराष्ट्राचा गौरव वाढविणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या दिमाखदार सोहळ्यात सादरीकरण करण्याचा बहुमान विध्यार्थ्यांना मिळाला असून, त्यांच्या वादनातून संजीवनीचा ‘राष्ट्रीय नाद’ घुमणार आहे.
नक्की वाचा : पाथर्डीत १.५५ लाख नागरिकांची तहान टँकरवर; ६८ गावांसह ३९५ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा
निवडक शालेय बँड पथकांसोबत संयुक्त सराव
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने ९ सप्टेंबर २०२६ रोजी पाठविलेल्या अधिकृत पत्रानुसार, संजीवनीच्या ब्रास बँड पथकाची ‘स्कूल बँड डिस्प्ले’मधील ‘बॉईज ब्रास बँड’ श्रेणीसाठी निवड झाली. त्यानुसार २१ ऑक्टोबरपासून एकतानगर येथे देशभरातील निवडक शालेय बँड पथकांसोबत संयुक्त सराव सुरू झाला. गेल्या दहा दिवसांपासून भारतीय लष्कराच्या पथकांसह सराव करताना संजीवनीच्या विद्याथ्र्यांनी वादनातील अचूकता, संचलनातील शिस्त, ताल-लय आणि सांघिक समन्वय यांचा उत्कृष्ट प्रत्यय दिला आहे.
दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर मिळालेली ही संधी विध्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि गुणवत्तेवर राष्ट्रीय स्तरावर उमटलेली मोहोर आहे. प्रत्येक सूर, ठेका आणि संचलनातील पाऊल अचूक साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतले. राष्ट्रीय स्तरावरील संयुक्त सरावातही त्यांनी आत्मविश्वास आणि शिस्तीचे दर्शन घडविले. संस्थेचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे आणि मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी विद्यार्थी व मार्गदर्शकांचे अभिनंदन करून आजच्या सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विश्वस्त श्री सुमित कोल्हे हे विध्यार्थ्यांसोबत एकतानगर येथे उपस्थित आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कोपरगावसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद कामगिरी (Sanjeevani Sainiki School)
या यशस्वी वाटचालीत विश्वस्त सुमित कोल्हे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन, संगीत शिक्षक महेश गुरव यांचे प्रशिक्षण, कल्चरल हेड शुभम जाधव यांचे नियोजन, कॅम्पस को-ऑर्डिनेटर विजय भास्कर यांचे समन्वय आणि प्राचार्य कैलास दरेकर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. बँड प्रशिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही योगदान महत्त्वपूर्ण आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही योग्य प्रशिक्षण, संधी आणि जिद्दीच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करता येते, हे संजीवनीच्या पथकाने दाखवून दिले आहे. आजचे सादरीकरण म्हणजे केवळ वादन नव्हे, तर शिस्त, मेहनत, सांघिक भावना आणि राष्ट्रप्रेमाचा गौरवपूर्ण आविष्कार ठरणार आहे. कोपरगावसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही निश्चितच अभिमानास्पद कामगिरी आहे.


