Local Crime Branch : नगर-पुणे महामार्गावर शस्त्रांसह दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; सहा आरोपी फरार

Local Crime Branch : नगर-पुणे महामार्गावर शस्त्रांसह दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; सहा आरोपी फरार

0

Local Crime Branch : नगर : मोक्का कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात फरार असलेले आरोपी पुन्हा नगर-पुणे महामार्गावर दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले. या कारवाईत तीन दुचाकी, दोन चाकू, एक घड्याळ आणि एक गलोर असा एकूण ३ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर सहा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे (Local Crime Branch)

ही कारवाई २९ ऑक्टोबर रोजी नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चास गावच्या शिवारात करण्यात आली. सुशांत सुरेश भोसले (वय २३, रा. पिंपळगाव कवडा, ता. अहिल्यानगर), वैभव किरण भोसले (वय २६, रा. धानोरा, ता. आष्टी, जि. बीड), अविनाश सावंत उर्फ सावत्या भोसले (वय २३, रा. पिंपळगाव कवडा) आणि राम उर्फ बोकड्या उर्फ बठ्या लखन काळे (वय १९, रा. कामरगाव, ता. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.