Cannabis plants : अकोले तालुक्यात दोडक्याच्या पिकात गांजाची झाडे; १५ लाख ३६ हजारांचा गांजा जप्त

पिकाच्या आड गांजाच्या झाडांची लागवड करून त्यांचे संवर्धन व जोपासना

0
Cannabis plants : अकोले तालुक्यात दोडक्याच्या पिकात गांजाची झाडे; १५ लाख ३६ हजारांचा गांजा जप्त
Cannabis plants : अकोले तालुक्यात दोडक्याच्या पिकात गांजाची झाडे; १५ लाख ३६ हजारांचा गांजा जप्त

Cannabis plants : अकोले : तालुक्यातील वाशेरे शिवारात दोडक्याच्या पिकामध्ये गांजाच्या झाडांची (Cannabis plants) लागवड करून त्यांची जोपासना केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अकोले पोलिसांनी (Akole Police) संबंधित शेतात छापा टाकून सुमारे १५ लाख ३६ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी विजय रघुनाथ गजे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Case registered) करून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नक्की वाचा : महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडले; अलर्ट सिस्टीममुळे चोरट्यांचा डाव फसला, पाथर्डीतील घटना

शेतात जाऊन छापा

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाशेरे शिवारातील एका शेतात दोडक्याचे पीक घेण्यात आले होते. मात्र या पिकाच्या आड गांजाच्या झाडांची लागवड करून त्यांचे संवर्धन व जोपासना केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने संबंधित शेतात जाऊन छापा टाकला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अकोले न्यायालयात हजर (Cannabis plants)

यावेळी दोडक्याच्या पिकामध्ये गांजाची झाडे लावून त्यांची जोपासना करण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी गांजाची झाडे आणि हिरवा पाला असा एकूण १५ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी विजय गजे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस हवालदार रविंद्र वाकचौरे, पोलीस शिपाई अविनाश गोडगे, तोरडकी, सुहास गोरे, महेंद्र गुंजाळ, मनोहर मोरे आणि गायकवाड यांनी सहभाग घेतला.दरम्यान, आरोपी विजय गजे याला अकोले न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप हजारे करीत आहेत.