The thieves’ plan failed : महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडले; अलर्ट सिस्टीममुळे चोरट्यांचा डाव फसला, पाथर्डीतील घटना

चोरीचा प्रयत्न उघडकीस येण्याची शक्यता लक्षात येताच संबंधित व्यक्तीने घटनास्थळावरून पळ काढला

0
The thieves' plan failed : महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडले; अलर्ट सिस्टीममुळे चोरट्यांचा डाव फसला, पाथर्डीतील घटना
The thieves' plan failed : महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडले; अलर्ट सिस्टीममुळे चोरट्यांचा डाव फसला, पाथर्डीतील घटना

The thieves’ plan failed : पाथर्डी : शहरातील शेवगाव रोडवरील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम मशीनला (ATM Machine) शनिवारी (ता.३१) रात्री दोनच्या सुमारास चोरट्याने लक्ष्य केले. एटीएममध्ये प्रवेश करून मशीन फोडत आतील रोकड चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, एटीएमच्या आधुनिक अलर्ट सिस्टीममुळे (Alert System) तातडीने सूचना मिळाल्याने चोरट्याने घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे एटीएममधील रक्कम चोरी (Theft) होण्यापासून वाचली. पाथर्डी पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.

नक्की वाचा : संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; नऊ जण ताब्यात

मशीनचे लॉक तोडून आतील रक्कम काढण्याचा प्रयत्न

पाथर्डी शहरातील शेवगाव रोडवर बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा असून बँकेला लागूनच एटीएम मशीन आहे. शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने एटीएममध्ये प्रवेश केला. त्यानंतर एटीएम मशीनचे लॉक तोडून आतील रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मशीनमधील अलर्ट सिस्टीम कार्यान्वित झाल्याने चोरीचा प्रयत्न उघडकीस येण्याची शक्यता लक्षात येताच संबंधित व्यक्तीने घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे एटीएममधील रक्कम चोरीला जाण्यापासून बचावली.या घटनेची माहिती मिळताच रात्री गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर, पोलीस कर्मचारी इजाज सय्यद, महेश रुईकर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

The thieves' plan failed : महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडले; अलर्ट सिस्टीममुळे चोरट्यांचा डाव फसला, पाथर्डीतील घटना
The thieves’ plan failed : महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडले; अलर्ट सिस्टीममुळे चोरट्यांचा डाव फसला, पाथर्डीतील घटना

ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण (The thieves’ plan failed)

त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक नितीन कंडारे यांनीही एटीएम परिसराची पाहणी केली.सकाळी घटनास्थळी ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एका संशयिताची ओळख पटवून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. प्राथमिक माहितीनुसार, ताब्यात घेतलेली व्यक्ती मनोरुग्ण असून तो पर जिल्ह्यातील असल्याची चर्चा आहे. मागील पाच दिवसांपूर्वी शहरातील फुलेनगर येथे धाडसी चोरी झाली होती त्यात लाखोंचा ऐवज चोरी गेला होता तसेच भगवान नगर येथे दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला होता. पुन्हा आता एटीएम कडून चोरीचा प्रयत्न झालेला आहे.या घटनेमुळे चोऱ्याचे प्रमाण वाढत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.