Ahilyanagar Drought : पाणीटंचाईची भीषण झळ! नगर तालुक्यातील २२ गावांना टँकरने पाणीपुरवठा, ४ नवी गावे रांगेत

0
Ahilyanagar Drought : पाणीटंचाईची भीषण झळ! नगर तालुक्यातील २२ गावांना टँकरने पाणीपुरवठा, ४ नवी गावे रांगेत

नगर : महाराष्ट्र (Ahilyanagar Drought) सध्या पावसाअभावी दुष्काळाने होरपळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात विकत घ्यावे लागणारे पाणी, तहानलेली माणसे, जनावरे, चारा- पाण्याअभावी संकटात सापडलेले पशुधन. जळालेल्या पिकांसोबत जगण्यासाठी संघर्ष करणारा बळीराजा. पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची चाललेली भटकंती अशी परिस्थिती सगळीकडे सध्या पाहायला मिळत आहे. अशीच विदारक अवस्था नगर तालुक्यातील ग्रामीण भागाची सुद्धा झाल्याचं पाहायला मिळत आहे. ऑक्टोबरमध्येच गंभीर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यात अनेक गावे पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. विशेष बाब म्हणजे नगर तालुक्यातील सुमारे ५० हजार नागरिक हे टँकरच्या पाण्यावर (50,000 citizens dependent on tanker water) तहान भागवत आहेत.

नक्की वाचा : भीमाशंकरसारखा अहिल्यानगरमध्ये १८ वर्षांपूर्वीच तयार झाला होता जलविद्युत प्रकल्प;किती वृक्ष तोडली?

नगर तालुक्याची परिस्थिती काय? (Ahilyanagar Drought)

नगर तालुक्यातील २२ गावांना सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात भरीत भर आणखी चार गावांचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. भूजल पातळी झपाट्याने
खालावत असल्याने विहिरी, कूपनलिका कोरड्या पडत आहेत. पाण्याबरोबरच चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे दुष्काळाच्या झळा संपूर्ण ग्रामीण जीवनाला होरपळून काढताना दिसत आहे. नगर तालुक्यात यापूर्वी १९ गावांत टँकर सुरू होते. त्यात आता तीन गावांची भर पडली आहे. आठवड, जांब कौडगाव व वडगाव तांदळी येथे नव्याने टँकर सुरू केले आहेत. सोनेवाडी (चास), रुईछत्तीसी, गुंडेगाव व देवगाव या चार गावांचे टँकरचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. ज्या ठिकाणी आधीच टँकर सुरू आहेत त्या  ठिकाणी पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने वाढीव टँकरची मागणी होत आहे.

अवश्य वाचा : पत्नी, तिचा प्रियकर यांच्या त्रासामुळे पतीने संपविले जीवन; मिरजगाव येथील घटना

टँकर सुरू असलेली गावे कोणती? (Ahilyanagar Drought)

इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी, मदडगाव, रांजणी, अकोळनेर, खांडके, भोयरेपठार, बाळेवाडी, भोयरे खुर्द, उक्कडगाव, कोल्हेवाडी, सांडवे, भातोडी, पारगाव, बाबुर्डी, जेऊर, मांडवे, चिचोंडी पाटील, कौडगाव (जांब), आठवड, वडगाव तांदळी या  गावात टँकर हे सुरु आहेत, त्यात अजून चार गावांची भर पडलीय. ती गावं आहेत  सोनेवाडी (चास), देवगाव, रुईछत्तीसी, गुंडेगाव.

दुष्काळाची सर्वाधिक झळ शेतकऱ्यांसोबत त्यांच्या पशुधनालाही बसत आहे. शेतकऱ्याच्या हातची पिके गेली आहेत. त्यामुळे आता जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. सुमारे अडीच लाख पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुरेसा चारा मिळत नसल्याने दूध उत्पादनातही घट झाली आहे. आता शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नसल्याने ऐन दिवाळीत बाजारपेठेतील उलाढाल सुद्धा मंदावली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चक्र मंदावले असून, आगामी आठ-नऊ महिने कसे काढायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

पशुधन, पिण्याच्या पाण्यासोबतच याच शेतकऱ्याला संत्रा, डाळिंब, पेरू, आंबा यांसारख्या फळबागा उभ्या करण्यासाठी अनेक वर्षे मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी लाखो रुपये हे खर्चही करावे लागतात. मात्र यंदा पाणी, खते, औषधे व मजुरीवर मोठा खर्च करून फुलविलेल्या बागा आता दुष्काळाच्या कचाट्यात सापडल्या आहेत. विहिरी, कुपनलिकांमधील पाणी कमी होत असल्याने फळझाडे जगविणे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.