
State-level Mixed Boxing Championship : अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मिक्स बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय मिक्स बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा (State-level Mixed Boxing Championship) राष्ट्रीय पाठशाळा, माळीवाडा येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध तालुक्यातील १५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
‘या’ गटातील खेळाडूंचा समावेश
या स्पर्धेतून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची राज्यस्तरीय मिक्स बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये सेमी कॉन्टॅक्ट आणि फुल कॉन्टॅक्ट प्रकारातील सब ज्युनियर, ज्युनियर व सिनियर (मुले व मुली) गटातील खेळाडूंचा समावेश आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मान्यवर उपस्थिती (State-level Mixed Boxing Championship)
या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय पाठशाळेचे बोडखे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. नारायण संपत कराळे, उपाध्यक्ष मच्छिंद्र साळुंखे, सचिव हरी सानप, खजिनदार शशिकांत नवगिरे आदी मान्यवर उपस्थित होते. पंच म्हणून ओमकार भंडारी, कार्तिक काळे, सिद्धेश यादव व सुशांत मिसाळ यांनी काम पाहिले.
राज्यस्तरीय स्पर्धा दि. २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी शिर्डी येथे होणार असून, अहिल्यानगरच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करावे, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडावळे, आमदार अक्षय दादा कर्डिले, प्रगतिशील शेतकरी सुनील कराळे, पोखर्डी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष विक्रम वारुळे, माजी सरपंच अंतु वारुळे, शेंडी गावचे अविनाश शिंदे, सुरेश शेठ वारुळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
निवड झालेले खेळाडू : गणेश गुगळे, करण युवराज सातव, कुणाल वारे, शंभू सतीश रसाळ, कृष्णा परकाळे, संकेत कोरडे, अर्थ भोसले, गणेश बांगर, हरिदास धोत्रे, सार्थक बांगर, ओम राहुल ढगे, सागर ईश्वर सानप, रोनक सिंग, कार्तिक दत्तात्रय मुटकुळे, सोहम राजेंद्र बैरागी, पार्थ जगताप, आरुषी भापकर, श्रावणी घनवट, आदिती आजिनाथ विघ्ने, गार्गी झिने, स्वराली अमोल बुधवंत, रोमी पुरण जाटव, आराध्या कराळे, वेदिका डाके, आलिना सलमान शेख, कृष्णा परदेशी, उदय विठ्ठल लष्कर, स्वरा नवनाथ भगत, शिवन्या संदीप खांदवे, भक्ती बैरागी, सोहम अविनाश कराळे, वरद एकनाथ फासाटे, चेतन खटके, अनिकेत केकान, साई झिने, मयुरेश गोंडे, सोहम दुधाने, समर्थ राख, जीवन क्षीरसागर, समर्थ माने.


