Threat to blow up the court with a bomb : राज्यातील सात न्यायालयांना बॉम्बने उडविण्याची धमकी; अहमदनगर न्यायालयाची तपासणी

Threat to blow up the court with a bomb : राज्यातील सात न्यायालयांना बॉम्बने उडविण्याची धमकी; अहमदनगर न्यायालयाची तपासणी

0

Threat to blow up the court with a bomb : नगर : राज्यातील सात जिल्हा व सत्र न्यायालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी (Threat to blow up the court with a bomb) मिळाल्याने पोलीस प्रशासन सतर्क (Police administration on alert) झाले आहे. बीड, अहमदनगर , रत्नागिरी, परभणी, हिंगोली, ठाणे, सोलापूर आणि सातारा येथील न्यायालयांना धमकी मिळाल्यानंतर संबंधित ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अहिल्यानगर जिल्हा व सत्र न्यायालयाची बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून तपासणी करण्यात आली.

अचानक झालेल्या कारवाईमुळे गोंधळाचे वातावरण

धमकीची माहिती मिळताच अहिल्यानगर पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. न्यायालय परिसरातील वकील, न्यायाधीश, कर्मचारी आणि पक्षकारांना सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेर काढण्यात आले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे न्यायालय परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नागरिक, वकील आणि कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली होती.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सुरक्षेवर पोलिसांकडून लक्ष (Threat to blow up the court with a bomb)

दरम्यान, न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने न्यायालयाच्या परिसराची कसून तपासणी सुरू केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच न्यायालय परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी पोलिसांना सूचना दिल्या.

Threat to blow up the court with a bomb : राज्यातील सात न्यायालयांना बॉम्बने उडविण्याची धमकी; अहमदनगर न्यायालयाची तपासणी
Threat to blow up the court with a bomb : राज्यातील सात न्यायालयांना बॉम्बने उडविण्याची धमकी; अहमदनगर न्यायालयाची तपासणी

यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, भिंगार कॅम्पच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुदाम काकडे, आरपीआय उमेश परदेशी आणि बीडीडीएस पथकाचे उपनिरीक्षक अंबादास हुलगे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, धमकीच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान संशयस्पद काही वस्तू आढळून न आल्याने न्यायालयाचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले आहे.