Khamkarwadi Society : श्रीगोंदा : लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदा) येथील खामकरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या (Khamkarwadi Society) पंचवार्षिक निवडणुकीत नाहाटा – नागवडे (Nahata – Nagwade) युतीच्या ‘किसान क्रांती समविचारी पॅनल’ने १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक व दणदणीत विजय संपादन केला आहे. या निवडणुकीत पाचपुते गटाचा दारुण पराभव (Defeat) झाला असून, संपूर्ण पॅनलचा १३/० असा धुव्वा उडाला आहे.
नक्की वाचा : घरफोडीचा छडा लावा, अन्यथा रास्ता रोको; महिलांचा पोलीस प्रशासनाला इशारा
चुरशीच्या निवडणुकीत विरोधकांवर मात
खामकरवाडी सोसायटी निवडणुकी दरम्यान काही तांत्रिक अडचणींमुळे बाळासाहेब नाहाटा हे अटकेत असतानाही, त्यांचे सुपुत्र मितेश नाहाटा यांनी अतिशय परिपक्व व नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण पॅनलच्या निवडणुकीचे नेतृत्व केले. त्यांनी नागवडे गटाचे संचालक डी. आर. काकडे आणि समविचारी आघाडीचे भूषण साळवे यांना सोबत घेऊन अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत विरोधकांवर मात करत विजय खेचून आणला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
विजयी उमेदवार… (Khamkarwadi Society)
नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या या विजयाबद्दल नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार आणि जिल्हा बँकेचे संचालक दत्ताजी पानसरे यांच्यासह अनेकांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.काळे मुकिंदा दत्तात्रय, खेडकर सुनील रामदास , खोमणे संतोष रामचंद्र , गव्हाणे केशव सोपान , जगताप गोरख आबासाहेब , मगर किरण दत्तात्रय , साळवे दत्तू बाबू , ओव्हाळ सविता विठ्ठल , पिसे प्रमिला दिलीप , शेलार सविता संतोष , ओव्हाळ नीता सदाशिव , साळवे भूषण सुरेश , कोळपे संतोष चंदर हे उमेदवार विजयी झाले आहेत.



