नगर : संपूर्ण जग सध्या एल निनोच्या संकटाने ग्रासलेले आहे. भारतावरही या एल निनोचा प्रभाव पडत असून यंदा मान्सूनमध्ये म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. महाराष्ट्रात तर सरकारला थेट दुष्काळ जाहीर करावा लागला. पाऊसच न आल्याने शेतकऱ्यांच्या हातातून पीक गेले. दरम्यान आता एल निनोच्या संकटानंतर जगाला ला निनाचे (El Nino and La Nina Update) संकट भेडसावत आहे. हे संकट समोर आल्यास भारतात तुफान पाऊस, चक्रिवादळाचे संकट (The Threat of a Cyclone) येऊ शकते. याच पार्श्वभूमीवर ला निना संकट नेमके काय आहे? त्याचा काय परिणाम होऊ शकतो, हे सविस्तर वाचा…
एल निनोमुळे सध्या तापमान वाढलेले आहे. असे असतानाच आता ला निनाचे संकट भेडसावत आहे. जगावरील हे संकट अजूनही संपलेले नाही. जागतिक हवामान संघटनेने एल निनोचे संकट अजूनही संपलेले नसून त्याचा प्रभाव २०२७ सालातही कायम असेल, असे सांगितले आहे.
नक्की वाचा : दिवाळीच्या तोंडावर २२ लाख लाभार्थ्यांचे रेशनचे धान्य बंद ; अहिल्यानगर जिल्ह्यात २ लाख लाभार्थ्यांची पडताळणी
‘अल निनो’ आणि ‘ला निना’ काय आहेत? कसा असतो प्रभाव? (El Nino and La Nina Update)
नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच NOAA नुसार, दर ३ ते ७ वर्षांनी निर्माण होणाऱ्या या दोन्ही हवामान पद्धतींना एकत्रितपणे अल निनो-सदर्न ऑसिलेशन (ENSO) म्हटले जाते. स्पॅनिश भाषेत ‘अल निनो’ म्हणजे ‘लहान मुलगा’ तर ‘ला निना’ म्हणजे ‘लहान मुलगी’ होय.
अवश्य वाचा : भीमाशंकरसारखा अहिल्यानगरमध्ये १८ वर्षांपूर्वीच तयार झाला होता जलविद्युत प्रकल्प;किती वृक्ष तोडली?
अल निनो – यात पूर्वेकडील व्यापारी वारे कमकुवत होतात किंवा त्यांची दिशा बदलते. यामुळे मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान असामान्यपणे वाढते.
ला निना – यात व्यापारी वारे नेहमीपेक्षा अधिक वेगाने वाहतात आणि उष्ण पाणी आशिया तसेच ऑस्ट्रेलियाजवळील पश्चिम प्रशांत महासागराकडे ढकलले जाते. यामुळे दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीवर खोलवरचे थंड पाणी वर येते.
ला निनाचे परिणाम? (El Nino and La Nina Update)

ला निनामुळे भारतात भारतात मान्सून अधिक सक्रिय होण्याची किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असते. हिवाळा अधिक थंड असतो. ऑस्ट्रेलिया आणि आग्नेय आशियासारख्या भागात मुसळधार पाऊस आणि महापूर येतो. त्यामुळे शेती, जलसाठे आणि पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही स्थिती महत्त्वाची ठरू शकते. मात्र, ला निनाचा प्रभाव असला तरी भारतातील प्रत्येक भागात समान पाऊस पडेलच असे नाही.
अतिवृष्टी आणि चक्रीवादळांचा धोका किती? (El Nino and La Nina Update)
ला निनामुळे जागतिक हवामानाच्या स्थितीत बदल होऊ शकतात. काही प्रदेशांमध्ये मुसळधार पाऊस, अतिवृष्टी किंवा वादळी हवामानाची शक्यता वाढू शकते. मात्र, भारतात चक्रीवादळे निर्माण होणे किंवा अतिवृष्टी होणे हे केवळ ला निनावर अवलंबून नसते. समुद्राचे तापमान, वाऱ्यांची दिशा, वातावरणातील आर्द्रता आणि इतर हवामान घटकही महत्त्वाचे असतात. या दोन्ही घटना प्रशांत महासागरात सुरू होत असल्या तरी त्यांचा परिणाम संपूर्ण जगावर होतो. यामुळे भारतात मुसळधार पाऊस, आफ्रिकेत दुष्काळ आणि इतर खंडांमध्ये तीव्र चक्रीवादळे बघायला मिळू शकतात. मात्र दुष्काळजन्य परिस्थितीत जर भारतात पुन्हा ला निनाचं संकट आलं तर याचे परिणाम वाईट होऊ शकतात, अशी शक्यता आहे.



