Shah Rukh Khan Birthday : शाहरुख खानच्या वाढदिवशी ‘किंग’मधील पहिले गाणे ‘तू मिल जाए’ प्रदर्शित; अरिजित सिंह आणि एड शीरन यांच्या आवाजाची जादू

0
Shah Rukh Khan Birthday : शाहरुख खानच्या वाढदिवशी ‘किंग’मधील पहिले गाणे ‘तू मिल जाए’ प्रदर्शित; अरिजित सिंह आणि एड शीरन यांच्या आवाजाची जादू

नगर : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने आपल्या वाढदिवशी (Shah Rukh Khan Birthday) चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. सुपरस्टारने आपल्या आगामी अ‍ॅक्शन एंटरटेनर ‘किंग’मधील ‘तू मिल जाए’ (Tu Mil Jaye Song) या पहिल्या गाण्याचा पडदा अखेर उघडला आहे. या गाण्यासाठी संगीत आणि सिनेमाच्या जगातील काही रोमांचक नावे एकत्र आली आहेत. या गाण्यात अरिजित सिंह यांचा सुरेल आवाज आणि एड शीरनची अनोखी रॅप शैली यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला आहे. यासोबतच शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही प्रेक्षकांच्या सर्वाधिक आवडत्या ऑनस्क्रीन जोड्यांपैकी एक जोडी पुन्हा एकदा या गाण्यात पाहायला मिळत आहे.

नक्की वाचा : दिवाळीच्या तोंडावर २२ लाख लाभार्थ्यांचे रेशनचे धान्य बंद ; अहिल्यानगर जिल्ह्यात २ लाख लाभार्थ्यांची पडताळणी

गाण्यात नेमकं काय? (Shah Rukh Khan Birthday)

या म्युझिक व्हिडिओमधून ‘किंग’च्या विश्वाची झलक पाहायला मिळते.या गाण्याची सुरुवात शाहरुख खान यांच्या दमदार संवादाने होते, “मैं कातिल नहीं आशिक हूं और निशान मेरा माशूका, और वह आशिक ही क्या जो दिल चीर ना दे.” या संवादातून त्यांच्या व्यक्तिरेखेचा स्वभाव आणि चित्रपटाचा मूड लगेचच स्पष्ट होतो. त्यानंतर ऐकायला मिळते एक उत्साही आणि रोमँटिक डान्स ट्रॅक, ज्यामध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक अरिजित सिंह आणि जागतिक पॉप सेन्सेशन एड शीरन एकत्र आले आहेत.

दोन वेगवेगळ्या संगीतविश्वांना जोडणारा हा एक खास म्युझिकल कोलॅबोरेशन आहे. याशिवाय, मधुबंती बागची यांच्या सुरेल आवाजाने या गाण्याला आणखी खास बनवले आहे. रोमान्स, अ‍ॅक्शन आणि थरार यांचा अनोखा संगम असलेले हे गाणे ‘किंग’ची एक वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर आणते. 

अवश्य वाचा : ‘अल निनो’नंतर आता ‘ला निना’चा तडाखा? नेमका फरक काय?

‘तू मिल जाए’ या गाण्याला सचिन-जिगर यांनी संगीत दिले असून, कुमार यांनी गीतलेखन केले आहे. पीयूष-शाजिया यांनी गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे, तर एड शीरनने यातील इंग्रजी रॅप लिहिला आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांची रोमँटिक केमिस्ट्री पुन्हा या गाण्यात एकदा अनुभवायला मिळत आहे. ‘तू मिल जाए’ हे गाणे सर्व प्रमुख म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहे. तसेच, या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ झी म्युझिक कंपनी आणि टी-सीरिजच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे.

चित्रपट २४ डिसेंबर २०२६ ला होणार रिलीज (Shah Rukh Khan Birthday)

सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मारफ्लिक्स पिक्चर्स यांनी केली आहे. ‘किंग’ हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.