Accused In Custody : टाकळी ढोकेश्वरमध्ये घरफोडी करणारी जालना जिल्ह्यातील टोळी जेरबंद; तीन जण ताब्यात

जप्त मुद्देमालामध्ये ८ लाखांची कार, १ लाखांची मोटारसायकल आणि ८ लाख ४० हजार रुपये किमतीचे ६० ग्रॅम सोने यांचा समावेश

0
Accused In Custody : टाकळी ढोकेश्वरमध्ये घरफोडी करणारी जालना जिल्ह्यातील टोळी जेरबंद; तीन जण ताब्यात
Accused In Custody : टाकळी ढोकेश्वरमध्ये घरफोडी करणारी जालना जिल्ह्यातील टोळी जेरबंद; तीन जण ताब्यात

Accused In Custody : पारनेर : टाकळी ढोकेश्वर येथील खिलारी वस्तीवर घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने (Gold ornaments) चोरणाऱ्या जालना जिल्ह्यातील टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात (Accused In Custody) घेतले असून, गुन्ह्यात वापरलेली कार, मोटारसायकल आणि ६० ग्रॅम वजनाचे सोने असा एकूण १७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे पारनेर तालुक्यातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

नक्की वाचा : खामकरवाडी सोसायटीमध्ये नाहाटा- नागवडे युतीला यश; पाचपुते गटाचा पराभव

तपासासाठी पथक नियुक्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १.१० वाजता खिलारी वस्ती, टाकळी ढोकेश्वर येथील मंगल संतोष गोरडे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात तीन चोरट्यांनी ३ लाख ९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तपासासाठी पथक नियुक्त केले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करताना हा गुन्हा जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथील कार्तिक प्रकाश आव्हाड व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

चोरीसाठी कार आणि मोटारसायकलचा वापर (Accused In Custody)

त्यानुसार पोलिसांनी कार्तिक आव्हाड (वय २०), गणेश प्रकाश आव्हाड (वय २०) अभिषेक ऊर्फ अभि प्रकाश लोमटे (वय २१) या तिघांना ताब्यात घेतले. तपासात कार आणि मोटारसायकलचा वापर करून चोरी केल्याची माहिती समोर आली. या प्रकरणातील अर्जुन गणपत गायकवाड, पूजा प्रकाश आव्हाड आणि सुमित विनायक पांजगे हे अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त मुद्देमालामध्ये ८ लाखांची कार, १ लाखांची मोटारसायकल आणि ८ लाख ४० हजार रुपये किमतीचे ६० ग्रॅम सोने यांचा समावेश आहे. ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पारनेर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील तपास पारनेर पोलीस करीत आहेत.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी केली.