Reduction in water supply to Ahilyanagar city : अहिल्यानगर शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात, सध्याच्या एक दिवसाआड पाणी पुरवठ्यासह आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Reduction in water supply to Ahilyanagar city : अहिल्यानगर शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात, सध्याच्या एक दिवसाआड पाणी पुरवठ्यासह आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

0
Reduction in water supply to Ahilyanagar city : अहिल्यानगर शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात, सध्याच्या एक दिवसाआड पाणी पुरवठ्यासह आठवड्यातून एक दिवस पाणी बंद
Reduction in water supply to Ahilyanagar city : अहिल्यानगर शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात, सध्याच्या एक दिवसाआड पाणी पुरवठ्यासह आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Reduction in water supply to Ahilyanagar city : अहिल्यानगर : संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानेही (State Government) पाणी वापरात किमान १० टक्के कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन करण्यासाठी सध्याच्या एक दिवसाआड पाणी पुरवठ्यासह आठवड्यातून एक दिवस शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा (Reduction in water supply to Ahilyanagar city) किंवा पुरवठ्याच्या वेळेत १५ मिनिटे कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्त यशवंत डांगे यांनी हे आदेश दिले आहेत. वेळेत कपातीची अंमलबजावणी विलष्ट असल्याने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याबाबत दिवाळीनंतर अंमलबजावणी होणार आहे.

प्रेशर पंप चालकांचे नळ कनेक्शन बंद करण्याचे आदेश

पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणाऱ्या प्रेशर पंप चालकांची तातडीने तपासणी करून त्यांचे नळ कनेक्शन तत्काळ बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. शहरात बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरणाऱ्यांचेही नळ कनेक्शन प्रभागनिहाय पथकांमार्फत तात्काळ तोडण्यात येणार आहे. याशिवाय, संपूर्ण हद्दीतील अनधिकृत नळ जोडण्या व जलवाहिनी बंद करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तोट्या नसलेल्या नळ कनेक्शनधारकांना स्वखचनि तातडीने तोट्या बसवण्याची सक्त ताकीद देण्यात आली असून, तसे न केल्यास कारवाई केली जाईल. तसेच, शहरातील सर्व सरकारी नळ खांबे (स्टँडपोस्ट) पूर्णपणे तपासून शंभर टक्के बंद केले जाणार आहेत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पाणी बचतीसाठी जनजागृती व दंडात्मक कारवाई होणार (Reduction in water supply to Ahilyanagar city)

पिण्याच्या पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी किंवा रस्त्यावर मारण्यासाठी करू नये, असे आवाहन करूनही पाण्याचा अपव्यय केल्यास थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच, नळाला थेट मोटार वापरल्यास नळ कनेक्शन कायमचे बंद केले जाईल. पिण्याव्यतिरिक्त इतर आवश्यक कामांसाठी नागरिकांनी बोअरवेल आणि जुन्या विहिरींचा वापर वाढवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तीन ग्रामपंचायतींसह जलतरण तलावाच्या पाण्यात ५० % कपात (Reduction in water supply to Ahilyanagar city)

शहरातील पाणीकपातीबरोबरच मनपाच्या मुख्य जलवाहिनीवरून पाणीपुरवठा होत असलेल्या देहरे, शिंगवे नाईक आणि विळद गवळीवाडा या तीनही ग्रा.पं. च्या पाणीपुरवठ्यातही ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, मनपाच्या जलतरण तलावाचा पाणीपुरवठा ५० टक्के कमी करण्याचे अथवा तो बंद ठेवण्याचे आदेश पाणीपुरवठा विभाग प्रमुखांना दिले आहेत.

उपसा थांबण्याच्या आदेशामुळे मनपाकडून कपातीचा निर्णय

सध्या एक दिवसाआड पाणी पुरवठा असल्याने पाणी कपातीचे आदेश होऊनही महापालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतला नव्हता. मात्र, मुळा पाटबंधारे विभागाने उपसा केंद्रांवर निरीक्षकांच्या नियुक्त्या करून अतिरिक्त पाणी उपसा केल्यास उपसा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी, कपातीसाठी दबाव वाढल्याने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरवठ्याच्या वेळेत १५ मिनिटे कपातीची अंमलबजावणी क्लिष्ट असल्याने आठवड्यातून एकदा पाणी बंद ठेवण्याचा पर्याय निवडण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here