District Bank Election : सहकार विकास आघाडीचे जिल्हा बँकेवर निर्विवाद वर्चस्व; १७ जागांवर दणदणीत विजय

विखे-थोरात एकजुटीला मतदारांची पसंती; अनेक मतदारसंघांत मोठ्या मताधिक्याने उमेदवार विजयी

0
District Bank Election : सहकार विकास आघाडीचे जिल्हा बँकेवर निर्विवाद वर्चस्व; १८ पैकी १७ जागांवर दणदणीत विजय
District Bank Election : सहकार विकास आघाडीचे जिल्हा बँकेवर निर्विवाद वर्चस्व; १८ पैकी १७ जागांवर दणदणीत विजय

District Bank Election : नगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (District Central Cooperative Bank) संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार विकास आघाडीने अभूतपूर्व यश संपादन करत लढवलेल्या १८ पैकी १७ जागांवर विजय (Victory) मिळविला आहे. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सहकार विकास आघाडीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून, विखे-थोरात (Vikhe-Thorat) यांच्या राजकीय एकजुटीवर जिल्ह्यातील शेतकरी, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि बँकेच्या सभासदांनी विश्वासाची मोहोर उमटविली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, चंद्रशेखर घुले यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेला हा विजय जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घडामोड ठरला आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ संचालक मंडळाच्या निवडीपुरती मर्यादित नव्हती, तर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील नेतृत्व, संघटनशक्ती आणि राजकीय समन्वयाची कसोटी मानली जात होती. या पार्श्वभूमीवर सहकार विकास आघाडीने सुरुवातीपासूनच एकजुटीची भूमिका घेत नियोजनबद्ध पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाण्याची रणनीती आखली. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी आणि सभासद यांच्याशी असलेला संपर्क, स्थानिक नेत्यांमधील समन्वय आणि कार्यकर्त्यांची संघटनात्मक ताकद या सर्व बाबींचा आघाडीला मोठा फायदा झाला.

नक्की वाचा : बंदी आरोपींकडून पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मोठ्या मताधिक्याने विजय

या निवडणुकीत सहकार विकास आघाडीने केवळ जागांची संख्या मिळविण्यावर समाधान न मानता अनेक मतदारसंघांत प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. कृषी, बिगरशेती, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय तसेच महिला मतदारसंघांमध्ये आघाडीच्या उमेदवारांना मिळालेला भक्कम पाठिंबा हा या विजयाचा महत्त्वाचा पैलू ठरला. विविध मतदारसंघांतील मतमोजणीदरम्यान उमेदवारांनी घेतलेली मोठी आघाडी पाहता मतदारांनी सहकार विकास आघाडीच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त केल्याचे चित्र स्पष्ट झाले.

निवडणूक प्रक्रियेत संगमनेरमधून रणजीतसिंह देशमुख, नेवासा येथून शंकरराव गडाख, राहाता येथून डॉ. सुजय विखे पाटील, श्रीरामपूरमधून करण ससाणे, पाथर्डीतून आमदार मोनिका राजळे, शेवगावमधून राजश्री घुले पाटील, श्रीगोंद्यातून दत्तात्रय पानसरे, कोपरगावमधून बिबिन कोल्हे, नगर तालुक्यातून अक्षय कर्डिले आणि बिगरशेती मतदारसंघातून सचिन जगताप यांची बिनविरोध निवड झाली. विविध तालुक्यांतील नेतृत्वाने सहकार विकास आघाडीला दिलेली साथ आणि निवडणुकीपूर्वीच झालेली ही बिनविरोध निवड आघाडीच्या संघटनात्मक ताकदीचे द्योतक ठरली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

प्रत्यक्ष निवडणुकीतही मोठ्या मताधिक्याने विजयाची मोहोर (District Bank Election)

प्रत्यक्ष निवडणुकीतही सहकार विकास आघाडीच्या उमेदवारांनी आपले वर्चस्व कायम राखले. काळे आशुतोष अशोकराव, नागवडे अनुराधाताई राजेंद्र, वाघ संगीता जयंत, पिचड वैभव मधुकर, जवळे करभारी झुंबर, सांगळे गणपतराव पुंजाजी आणि तनपुरे प्राजक्त प्रसाद यांनी विजय संपादन केला. अनेक मतदारसंघांत प्रतिस्पर्धी उमेदवारांना मोठ्या फरकाने मागे टाकत आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला. त्यामुळे सहकार विकास आघाडीच्या विजयाची व्याप्ती केवळ संख्यात्मक नसून मतदारांचा ठाम आणि निर्णायक कौल असल्याचे या निकालातून अधोरेखित झाले.

या निवडणुकीतील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे विखे-थोरात यांच्या एकजुटीला मिळालेला व्यापक प्रतिसाद. जिल्ह्याच्या राजकारणात वेगवेगळ्या काळात प्रभावी भूमिका बजावणाऱ्या नेतृत्वाने सहकार क्षेत्राच्या हितासाठी एकत्रितपणे काम करण्याची भूमिका घेतली. या एकत्रित प्रयत्नांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख, चंद्रशेखर घुले यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

आघाडीला निवडणुकीत निर्णायक यश

नेत्यांमधील समन्वय, तालुकानिहाय नियोजन, कार्यकर्त्यांची एकजूट आणि सभासदांशी असलेला थेट संपर्क यामुळे आघाडीला निवडणुकीत निर्णायक यश मिळाले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून विखे-थोरात यांच्या एकत्रित नेतृत्वाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, या निकालाचे पडसाद आगामी जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील समीकरणांवरही उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या ऐतिहासिक विजयाबद्दल सहकार विकास आघाडीतर्फे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव, बँकेचे सभासद, मतदार, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत. मतदारांनी दाखविलेला विश्वास आणि दिलेली साथ हीच आघाडीची खरी ताकद असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

जिल्हा बँक ही शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सहकार चळवळीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे या विजयातून मिळालेली जबाबदारी अधिक व्यापक असून, जिल्ह्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम करणे, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकटी देणे, सहकारी संस्थांचे सक्षमीकरण करणे आणि बँकेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला गती देणे यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका आघाडीतर्फे व्यक्त करण्यात आली. लढवलेल्या १८ पैकी १७ जागांवरील विजय, अनेक मतदारसंघांतील मोठे मताधिक्य आणि बिनविरोध निवडींच्या माध्यमातून सहकार विकास आघाडीने जिल्हा बँकेवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. हा विजय केवळ निवडणुकीचा निकाल नसून जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील एकजूट, नेतृत्वावरील विश्वास आणि सामूहिक प्रयत्नांना मिळालेली मोठी पावती ठरला आहे.

उमेदवारांना मिळालेली मते


महिला राखीव 2 जागा

अनुराधा नागवडे : २६४१
संगीता वाघ : २२९२
हर्षदा काकडे : १४८९
संध्या महांडुळे : ४६४.

भटक्या जमाती विमुक्त जाती

गणपतराव सांगळे : २४६१
ऋषिकेश ढाकणे : १२८७

इतर मागास प्रवर्ग

कारभारी जावळे : २६७६
जालिंदर वाकचौरे : ७३३

अनुसूचित जाती जमाती

वैभव पिचड : २६९०
प्रशांत लोखंडे : १०८६

पारनेर सोसायटी मतदारसंघ

निलेश लंके : ६४
राहुल शिंदे. : ४०

कर्जत सोसायटी मतदारसंघ

ज्योती प्रकाश शिंदे : ५४
तुषार अंबादास पिसाळ : २०

राहुरी सोसायटी मतदारसंघ

प्राजक्त तनपुरे. : ८९
सत्यजित कदम : १८

अकोले सोसायटी मतदारसंघ

संजीवनी शिंदे. : ४९
किरण लहामटे : ३६