
Death Threat : नगर : अहिल्यानगर मध्यवर्ती कारागृहात बंदी आरोपींनी कर्तव्यावर असलेल्या कारागृह (Prison) पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची व कुटुंब संपवण्याची धमकी (Death Threat) दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल झाला आहे.
नक्की वाचा : जिल्हा बँकेच्या दहा जागांसाठी ३८०९ मतदारांनी केले मतदान
एक बंदी पाण्याच्या टाकीवर चढलेला दिसला
मथुर गोरख धामोरे (वय ३३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता नेहमीप्रमाणे तट क्रमांक ९ येथे कर्तव्यावर हजर होते. सकाळी ८.३० वाजता ते हेड कॉन्स्टेबल सुनील विघाते यांच्यासोबत तट राउंड (पेट्रोलिंग) करत असताना बॅरेक क्र. ३ च्या पाण्याच्या टाकीवर एक बंदी चढलेला दिसला. बंदी निलेश बाळासाहेब जाधव याला खाली उतरण्यास सांगितले असता, त्याने मला विजय राजू पठारे (भाऊ) याने पाठवले आहे असे सांगून उलट शिवीगाळ केली. त्याला समजावून खाली उतरवून सब-जेलरकडे घेऊन गेले असता तेथे निलेश बाळासाहेब जाधव, विजय राजू पठारे, गणेश उर्फ टिंण्या महादेव पोटे, मयूर अनिल आगे, अबुजर लतिफ राजे या बंदी आरोपींनी एकत्र येऊन फिर्यादी व त्यांचे सहकारी पोलीस राहुल किसन लोंढे, बबन नामदेव शिंदे यांना शिवीगाळ करून धमकी दिली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
फिर्यादीत म्हटले आहे की (Death Threat)
आमच्यावर मोक्का आहे, आम्ही सराईत गुन्हेगार आहोत, बाहेर आलो की तुझं खानदान संपवून गोळ्या घालू, गांजा पिऊ देत नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नमूद ५ बंदी आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


